Oct18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 18th October 2012
ANTIDOTE TO DISAPPOINTMENT DR. SHRINIWAS KASHALIKARDisciple: We try to serve the mankind and motivate them for holistic renaissance. But don't get optimum response. Why does this happen? What should we do?
Guru: Just as it is natural for a child of five years; not to have mustache; it in natural for us not to know what is true service and motivation for holistic renaissance. But at appropriate time; the child grows and the mustache appear; and we and the people too get matured and realize what is true service and holistic renaissance.
Service and awakening (inside and outside); and subsequent manifestation of holistic renaissance; are; a part of eternal process of getting attracted towards, studying and realizing the TRUTH. So, go on practicing NAMASMARAN (JAP, JAAP, JIKRA, SUMIRAN, SIMARAN i.e. SELF RECOLLECTION) and the appropriate blossoming will take place in you, your, instincts, feelings, thoughts, concepts, ideas, behavior and also; that of your family members and society. Do not worry.
ESSENCE IN MARATHI
वैफल्यावर राम बाण तोडगा
शिश्य: आम्ही लोकसेवा आणि लोकजागृती करण्याचा प्रयत्न करतो. पण प्रतिसाद आणि सहकार्य मिळत नाही. असे का होते? काय करावे?
गुरू: पाच वर्षांच्या लहान मुलाला ज्याप्रमाणे मिशा नसणे नैसर्गिक आहे; त्याप्रमाणे सुरुवातीला; आपल्याला देखील खरी लोकसेवा आणि खरी लोकजागृती म्हणजे काय हे माहीत नसणे स्वाभाविक आहे. पण कालांतराने मुलगा तरुण होऊन त्याला मिशा येणे; हे जसे साहजिक आहे; त्याप्रमाणे; आपल्यालाvआणि इतराना देखील; खरी लोकसेवा आणि लोकजागृती यांचे आकलन होणे अपरिहार्य आहे.
लोकसेवा आणि लोकजागृती ही निरंतर प्रक्रिया आहे. अनादी आणि अनंत सत्याकडे आकर्षित होणे, सत्य अभ्यासणे, सत्य अनुभवणे आणि सम्यक कल्याण प्रत्यक्षात आणणे; या वैश्विक महा प्रक्रियेचा तो एक घटक आहे. तुम्ही नामस्मरण ( जप, जाप, जिक्र, सुमीरण, सिमरन; म्हणजेच खर्या अर्थाने आत्मस्मरन) करीत जा. योग्य वेळी योग्य ते कल्याणकारी बदल तुमच्यात, तुमच्या वागण्या-बोलण्यात, तुमच्या कार्यात; आणि तुमच्या कुटुंबीयात, समाजात आणि परिस्थितीत होत जातील. काळजी करू नका.