Mar14
Posted by Dr. Suhas Mhetre on Thursday, 14th March 2013
नामस्मरण आणि अस्वस्थता: डॉ.श्रीनिवास कशाळीकर.अस्वस्थता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण शरीर आणि मन ही दोन्ही काळ
आणि अवकाश यान्च्या आधीन आहेत. सुख आणि दुख्ख ही देखील अवकाश आणि काळाच्या
आधीन आहेत. विचार देखील अवकाश आणि काळाच्या आधीन आहेत. ही एक प्रकारची
असहाय्यताच आहे. त्यामुळे हिन्सा, अहिन्सा, प्रेम, राग, द्वेष, खिन्नता,
उन्माद, निराशा; ही द्वन्द्वे देखील एक प्रकारची अपरिहार्यताच आहे.
कोण्त्याही एका भावनेत शान्ति नाही. समाधान नाही. कोणत्याही एका
मुल्यांमध्ये व तज्जन्य कृतीमध्ये समाधान नाही.
पण तरीही आपण एका कारणाने स्वस्थ बनू शकतो. ते म्हणजे; आपले गुरू आपल्याबरोबर असतात या वास्तवतेने. नामस्मरण करीत राहिल्यास या वास्तावतेचा अनुभव देखील येतो. हा अनुभव नामस्मरणाचे प्रमाण आणि उत्कटता जशी वाढतात तसा अधिकाधिक आंतरिक होतो; आणि जीवनाचे सर्वस्व बनतो.