Jun25
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 25th June 2013
श्रीराम समर्थ (स्वगत): डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरनामस्मरण करणे हे सर्वश्रेष्ठ धेय आहे; असे ठरले तरी मन विचलित होते. 24 तास नामस्मरण होणे अति कठीण!!
भोगवस्तू, पार्ट्या आणि आपला अहंकार फुगेल असे सर्वकाही देण्याघेण्यात; वेळ घालवायला, पैसा उधलायला; आणि प्रसंगी अपमान आणि हाल देखील सोसायला; आपल्याला काही वाटत नाही. पण नामस्मरणाच्यासाठी मात्र; पैसा, वेळ, शक्ति, यातील काहीच खर्च करण्याची किंवा लोकापवाद, अपमान, त्रास, कष्ट यातील काहीच सहन करण्याची आपली तयारी नसते!!!
मग अश्या वेळी काय करावे?
या प्रश्नाचे स्वत:पुरते तरी उत्तर मिळाले ते असे:
केवळ जगण्यासाठी , नव्हे; तर पैसा, घर, नोकरी, प्रमोशन, सत्ता, चैन; अश्या असंख्य बाबींसाठी आपण लाचार होतो. आतुर होतो. तळमळतो. असहाय्य होतो!
का? कारण वासनेचा जोर जबरदस्त आहे. वासनेची ओढ तीव्र आहे. वासना फसवी आहे. आपण नकळत तिच्या आधींन होतो. तिच्या आहारी जातो.
पण नामस्मराणाची ओढ तशी नसल्यामुळे; नामस्मरणाच्यासाठी; पैसा, वेळ, शक्ति, यातील काहीच खर्च करण्याची किंवा लोकापवाद, अपमान, त्रास, कष्ट यातील काहीच सहन करण्याची आपली तयारी नसते. हे आपल्यासाठी जसे खरे आहे; तसेच इतरांसाठीही खरे आहे.
म्हणूनच; "फुकट मिळालेल्या किंवा फुकट दिलेल्या वस्तुला किंमत नसते" ही सबब; नामस्मरणाच्या सीडीज किंवा/आणि पुस्तके; रुग्ण, विद्यार्थी, कर्मचारी, सहकारी आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीना भेट देण्याच्या; आणि तज्जन्य समाधानाच्या आड येऊ देऊ नये; हे खरे नाही का?
नामाचा प्रसार करण्याचा अध्यात्मिक अधिकार नसला तरी; नामस्मरणापासून मन सतत विचलित होऊ नये यासाठी आणि नामस्मरणात रंगून जाता यावे; यासाठी देह, घर, कुटुंब, व्यवसायाची जागा आणि एकंदर समाज यामध्ये पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी; काहीही झाले तरी; अगदी; "याला नामाचे वेड लागले" असा लोकापवाद झाला तरी; नामाचा प्रसार करावा!!
व्यक्ती म्हणून आपण अगदीच नगण्य असतो. आपली शारीरिक, मानसिक, बोद्धिक वा एकूणच शक्ती क्षुद्र असते. आपण अशक्त, असहाय आणिं परावलम्बी असतो. शिवाय; आपण दोशपूर्ण देखील असतो. पण तरीही आपण अनाठायी आणि अज्ञानजन्य अहंकाराने फुगून; द्वेष, मत्सर, घृणा आणि कलहात बरबाद होत असतो. नामस्मरणाने; प्रेमाची, परिपक्वतेची आणि परिपूर्णतेची जी अनंत प्रक्रिया आहे तिच्यामध्ये आपला सहभाग वाढत जातो.
जगातले बहुसन्ख्य लोक नामस्मरण करू लागले आहेत; आणि सुखी, सम्रुद्ध आणि उदात्त होताहेत या कल्पनेने देखील मन मोहरून जाते!!