Aug09
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 9th August 2013
तणाव आणि नामस्मरण डॉ. श्रीनिवास कशाळीकररुग्ण:सर! नामस्मरण (जप, जाप, जिक्र, सुमीरण, सिमरन, म्हणजेच ईश्वराचे किंवा स्वत:च्या आत्मतत्वाचे स्मरण) करण्याचा उपदेश बहुतेक सर्व संतानी आणि अवतारी व्यक्तीनी केला आहे; हे खरे! पण रोजचे ताण-तणाव आणि त्याचा काय संबंध?
डॉक्टर: रोजचे ताण तणाव म्हणजे वर-वरची लक्षणे आहेत. ताण तणाव आपल्या जागृत आणि सुप्त अशा सर्व पातळ्यांवर; सर्व स्थितींमध्ये; अगदी बेशुद्धीतही आहेत! झोप, स्वप्न आणि गर्भावस्थेत आहेत. सर्व सजीवान्मध्ये आहेत!
रुग्ण: पण आम्हाला वाटत होत; की ताण तणाव; अती स्पर्धा, कठीण उद्दिष्ट, भयावह असुरक्षितता आणि वेळेच्या जाचक बंधनामुळे येतात!
डॉक्टर: होय! पण तणावाच्या असंख्य कारणामधील ही फक्त काही कारणे आहेत!
रुग्ण: पण नामस्मरणासारखी वरपांगी परिणाम शून्य कृती संपूर्ण तणाव मुक्ती कशी साध्य करू शकते?
डॉक्टर: ते मी हळू हळू स्पष्ट करीनच. पण सध्या एवढ लक्षात ठेवा की; ज्याप्रमाणे नवजात बालकाला प्राण वायुच महत्व पटल नाही; तरी; श्वासोच्वास करण अत्यावश्यक असत; त्याप्रमाणे आम्हाला आज नामस्मरणाच महत्व पटल नाही; तरी ते करायला सुरूवात करण अत्यावश्यक आहे!