Oct23

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 23rd October 2015
नामस्मरणाला विरोध डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरणाला विरोध करणे म्हणजे प्रत्यक्षात काय असते? बुद्धिवाद? बुद्धीप्रामाण्यवाद? मुळीच नाही! नामस्मरणाला विरोध करणे म्हणजे कळत नकळत; स्वत:च्या; मर्यादित बुद्धी, भावना, वासना, संकुचित स्वार्थांधता, स्वत:तील अधोगामी प्रवृत्ती आणि जडत्व यांचा जयजयकार करणे व त्यांना समर्थन देणे! संकुचित वृत्ती प्रबळ झाल्या आणि आपल्यावर स्वार झाल्या की नामस्मरणाची घृणा येते, तिटकारा येतो आणि नामस्मरणाचा विरोध उफाळून येतो!
याउलट नामस्मरणाची सुरुवात होणे हे प्रत्येकाच्या अंतरंगातील उर्ध्वगामी ईश्वरी ओढीचे (नामाच्या सुप्त आकर्षणाचे) पर्यवसान असते. यालाच ईश्वरी कृपा वा गुरुकृपा म्हणतात. नामस्मरण करू लागताच आपण सर्वज्ञ आणि सर्वगुणसंपन्न होतो असे नव्हे. पण संकुचित अहंकाराविरोधात आणि क्षुद्र स्वार्थाविरोधात सुरु झालेली आणि वैश्विक एकात्मतेत परिणत होणारी ती प्रक्रिया असते. नामस्मरण ही ईश्वराची महान देणगी आहे, ईश्वराचा कृपाप्रसाद आहे!