Dec29
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 29th December 2015
विस्मरणाची नोंद: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरणाची नोंद ठेवली जाते. तिचे फायदे अनेक आहेत. उदा. आपला उत्साह टिकून राहतो किंवा वाढतो.
पुढे पुढे जर आपण विस्मरणाची नोंद देखील ठेवू लागलो तर
१. आपले विस्मरण अथांग असून आपले स्मरण अगदीच अल्प प्रमाणात होत असल्याचे जाणवते.
२. आपल्या अंगभूत जडत्वाची जाणीव ठळक होते.
३. त्यामुळे आपल्या अपेक्षा आणि आशा आपोआप कमी होतात.
४. नामाचे महत्व अधिक जाणवते.
५. वेळ वाया जाणे कमी होते.
६. स्मरण अधिक प्रमाणात आणि अधिक समरसतेने होते
७. नामस्मरण हे मुख्य आणि इतर सर्व काही त्याच्या तुलनेत गौण आहे असे पुन्हा पुन्हा आणि अधिकाधिक प्रमाणात मनावर बिंबते.
८. कितीही नामस्मरण झाले तरी ते कधीही “पुरेसे” नसते; हे कळू लागते! पण त्याचबरोबर; आपण जीवनाच्या सार्थकतेच्या योग्य मार्गावर असल्याच्या समाधानाची जाणीव अधिकाधिक दृढ होते!
पण या सर्वावर विश्वास न ठेवता त्याचा प्रत्यय घेणेच श्रेयस्कर ठरेल!
हे लिहिताना २५ मिनिटे नामविस्मरणात गेली!