Dec31
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 31st December 2015
स्वच्छता: डॉ. श्रीनिवास कशाळीकरस्वच्छतेवर माझा विश्वास असो वा नसो; मी स्नान करतो की नाही ह्याला महत्व आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे देवाधर्मावर माझा विश्वास असो वा नसो; मी नामस्मरण करतो की नाही ह्याला महत्व आहे!
स्नानाचे शास्त्र मला कळले असो वा नसो आणि स्नानाचे महत्व मला पटले असो वा नसो; मी स्नान करतो की नाही ह्याला महत्व आहे. त्याचप्रमाणे देवाधर्माचे ज्ञान मला असो वा नसो; देवाधर्माचे मला महत्व पटले असो वा नसो; मी स्वत: नामस्मरण करतो की नाही ह्यालाच अधिक महत्व आहे.