Apr19
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 19th April 2016
नौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची नौका आपल्यासाठी खुली केली आहे!
त्यामुळे, आपण कितीही पतित असलो; आणि इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला किंवा वेड्यात जरी काढले; तरी आपण विचलित होता कामा नये. खचता कामा नये. नाउमेद होता कामा नये.
आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू!
श्रीराम समर्थ!