May10
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 10th May 2016
श्रीराम समर्थ! डॉ. श्रीनिवास कशाळीकरकेवळ प्रारब्धजन्य- देहाबुद्धीजन्य - भ्रमजन्य भोगामुळेच मी नामेतर बाबींमध्ये गुरफटत व खितपत असतो.
वास्तविक मला; तीव्र कामना नामाचीच असते, चित्ताचा क्षोभ नामवियोगानेच होतो, हवेपणा नामात न रंगल्यामुळेच असतो, असुरक्षितता आणि चिंता नामाचे "घर" नसल्यामुळेच वाटत असते आणि नामाच्या परम वैभवाच्या अज्ञानामुळेच क्षणिक व क्षुद्र हानि-लाभामध्ये मद व मस्ती;वाटत असते!
गुरुकृपेनेच नाम घेत राहता येते आणि समाधान वाढत जाते!
श्रीराम समर्थ!