May11
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 11th May 2016
षड्रिपु आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकरषड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर.
शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास षड्रिपु नसणे शक्य नाही. म्हणून षड्रिपु त्याज्य आहेत असे म्हणून आपण त्यांच्या पासून मुक्त होऊ शकत नाही. पण हे देखील खरे की आयुष्यभर त्यांच्या मागे लागून आपण तृप्त मात्र होत नाही! समाधानी होत नाही!
असे का होते?
कारण षड्रिपुंची पूर्ती स्थूल आणि मंद असते! स्वतंत्रपणे ती अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचत नाही! धग मंद असेल तर ज्याप्रमाणे स्वयंपाक शिजत नाही, तसेच हे आहे!
जीवनातील सर्व सुख दु:ख्खाना नामस्मरणाचा अग्नी मिळाला तरच अनंतरात्म्याची तृप्ती होऊ लागते! आणि समाधान होऊ लागते! म्हणूनच समाधान मिळवायचे असेल तर जीवनामध्ये नामस्मरणाची तीव्र गरज आहे! अर्थात ह्याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकेल. केवळ विचाराने, वाचनाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने नाही!