May18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 18th May 2016
जग सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपल्या अंतर्मनात पुष्कळदा एक प्रकारची हुरहूर असते. आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक असू शकेल आणि असावे असे वाटत असते.
पण आपण जर हे लक्षात घेतले की हे जे आपल्याला वाटत असते, ते ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) “वाटत” असते, तर मग जगाला काय “वाटावे” हे देखील ईश्वरेच्छेनेच नाही का ठरणार?
तसेच आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणभंगुर असून, आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे ईश्वरेच्छेने “सुधारत” असते हे खरे नाही का?
म्हणूनच; “जग सुधारणे” म्हणजे “आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी बाजूला ठेवून ईश्वरेच्छेशी तद्रूप होणे” होय.
ईश्वरेच्छेनेच आपण नामस्मरण करीत असल्यामुळे आणि त्याचा प्रसार करीत असल्यामुळे; कुणी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे ईश्वरेच्छेनेच ठरते; आणि हे नामस्मरण करता करता समजते आणि आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होतो!
श्रीराम समर्थ!