May23
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 23rd May 2016
इलाज बेचैनीचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकरमुले दूर परदेशी राहत असली, आई-वडील लांब मायदेशी राहत असले, तर आपल्या मनांत एक सल असतो. हुर हूर असते. अगदी जवळच्या व्यक्तीच्या आजारीपणात आपण डॉक्टरचे उपचार करतो हे खरे, पण ते देखील कसलीच खात्री देऊ शकत नाहीत, त्यामुळे आपण असहाय्यच असतो! अगदी आपल छोटं बाळ कळवळून रडू लागल, तर देखील आपण हतबल होतो. एवढच नव्हे तर, आपल्या स्वर्गवासी आईवडिलांची आठवण आली तर देखील आपण कासावीस होतो! वाटत, आपण काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी!
अश्या सर्व वेळी काय करायचं?
सद्गुरू म्हणतात, अश्या असहाय्य वेळी फक्त नामस्मरणच आपल्याला आधार, सामर्थ्य, स्थैर्य, आणि स्वास्थ्य देते. सदा सर्व काळी, सर्व परिस्थितीत फक्त नामस्मरणच आपल्याला संजीवनी देते!
कितीही कठीण वेळ आली तरी न डगमगता; नामस्मरण करावेच करावे; हेच खरे!
श्रीराम समर्थ!