May25
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 25th May 2016
नाम आणि आनंद: डॉ. श्रीनिवास कशाळीकर गुरु म्हणजेच ईश्वर. तो अंतर्बाह्य सर्व काही व्यापून आहे. कालातीत आहे. आनंदमय आहे.
पण अहंकाराने आपण त्यापासून वेगळे होतो. वेगळेपणात अस्वस्थता, असुरक्षितता, धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती आहे.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर; अस्वस्थता, असुरक्षितता धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती ही अहंकाराची लक्षणे आहेत. स्वत:चे असो वा जगाचे; दु:ख घालवण्यासाठी आपण तळमळतो आणि धडपडतो! पण ज्याप्रमाणे कितीही मीठ घातले तरी “गोडी” वाढू शकत नाही, त्याप्रमाणे नुसते तळमळून आणि धडपडून स्वत:ला किंवा जगालाआनंद मिळू शकत नाही.
पण अहंकाराने धडपडता धडपडता आणि तळमळता तळमळता गुरुकृपेने नामस्मरणाचा मार्ग मिळतो आणि गुरुकृपेने नामस्मरण वाढत वाढत जाऊन गुरुकृपेची म्हणजेच परिस्थितीनिरपेक्ष अशा नामानंदाची अधिकाधिक प्रचीती येत जाते!
श्रीराम समर्थ!