Jun06
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 6th June 2016
कर्तव्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकरप्रत्येकाला पूर्णत्वाची आंस असते.
पण ती ओळखता येतेच असे नाही. तसेच शब्दात सांगता बोलता येतेच असे नाही. त्याचप्रमाणे ती आंस तृप्त करण्याचे साधन माहीत असतेच असे नाही. एवढेच नव्हे तर ते साधन कळले तरी त्या साधन मार्गावर चालता येतेच असेही नाही. आणि अखेर साधन मार्गावर चालू लागला तरी अखेरपर्यंत चिकाटीने चालत राहणे जमतेच असे नाही!
आपलेही तसेच असते!
म्हणून कधीही कुणाहीबद्दल असहिष्णू असणे योग्य नाही.
पण आपण सहिष्णू व्हायचा उपाय कोणता?
आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे.
तसे करता करता आपली इतरही कर्तव्ये आपोआपच आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने पार पाडली जातात!
श्रीराम समर्थ!