Jun15
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 15th June 2016
गोंदवलेकर महाराज म्हणतात: डॉ. श्रीनिवास कशाळीकरगोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे.
अगदी सुरुवातीला जेव्हा मी हे वाचले तेव्हा हे म्हणणे फारच सोपे वाटले. त्या तुलनेत मोक्ष, मुक्ती, समाधी, निर्वाण, इत्यादी शब्द कसे भारदस्त आणि वजनदार वाटत! खऱ्या अर्थाने तात्विक आणि प्रगल्भ वाटत! त्याहीपुढे अमृतत्व, IMMORTALITY, COSMIC, ETERNAL असे शब्द वाटत.
पण आज कळते आहे, की "हवे-नको"पण गेल्याशिवाय कालातीत होणे, अमृतात्वाचा साक्षात्कार होणे इत्यादी सर्व अशक्य आहे! किंबहुना साधक म्हणून आपली किती प्रगती झाली हे समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले हवेनकोपण किती कमी झाले हे पाहणे!
श्रीराम समर्थ!