Jun21
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 21st June 2016
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, "उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही,म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते.”
उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
नामात रंगण्याच्या अगोदरची पायरी म्हणजे नामाचा ध्यास, अखंड नाम घेणे, सतत नामाबद्दल बोलणे, कायम नामाबद्दल लिहिणे, नामाशिवाय काहीही न सुचणे, किंवा नामाचे वेड लागणे! नामात रंगणे म्हणजे आपले सर्व प्रकारचे हवे नकोपण पूर्णपणे संपणे! एका अर्थाने ही पूर्ण शरणागतीच होय. ही कठीण बाब आहे खरी, पण गुरुकृपेने नामस्मरण वाढत जाणे आणि ती अवस्था येणे अपरिहार्य आहे, त्याला पर्याय नाही!
श्रीराम समर्थ!