Jun26
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 26th June 2016
साक्षात्कार: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुध्दा नाहीत.” महाराज म्हणतात, “जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण”!
पण आम्हाला तर नेहमी साथ-संगत लागते. समूह लागतो. एकटेपणाचा विचार देखील नकोसा वाटतो! आजारपण, अडचणी आणि मृत्त्यूच्या विचाराने तर अंगावर काटाच येतो!
याचे कारण काय?
कारण अगदी सरळ आणि सोपे आहे! सद्गुरूंचे सांगणे अजून आम्हाला कळले नाही आणि वळले नाही! समजले नाही आणि उमजले नाही! त्यामुळे ते आहेत असे आम्हाला अगदी मनापासून वाटतच नाही!
सतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे क्षणोक्षणी सानिध्य जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का?
श्रीराम समर्थ!