Jul13

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 13th July 2016
जगणे डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपण जगतो म्हणजे काय करतो?
आपल्या जगण्याच्या बाह्य, वरवरच्या, थिल्लर, जुजबी आणि क्षणभंगुर बाबी म्हणजे आपले कपडे, खाणे-पिणे, शारीरिक उपभोग-भोग, यश-अपयश, मान-अपमान, फायदा-तोटा, कौटुंबिक सुख-दु:ख; इत्यादी. ह्यातले काही अनुभव खोलवर जाऊन बराच कालपर्यंत आपल्याला उत्तेजित किंवा उदास करीत राहतात हे खरे. पण तरीही ह्या बाबी आपल्याला स्वस्थ करीत नाहीत. कारण ही सर्व जगण्याची �टरफले� आहेत!
परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात. इतक्या जवळ की शरीराच्या मृत्यूने देखील त्या नष्ट होणार नाहीत याची आत पक्की खात्री होते आणि परम समाधान होते. जन्मभर आपण कळत-नकळत ज्याच्या शोधात होतो, ते हेच आणि ह्याचसाठी केला होता अटाहास असे मनोमन वाटते! हे �जगणे� शरीराच्या मृत्युनंतर देखील टिकून राहणार याची खात्री पटते.
जगण्याची �टरफले� दुय्यम बनतात आणि प्रसंगी निरर्थक आणि क:किंमत बनतात.
नामस्मरण करणाऱ्यांना ह्याचा पडताळा घेता येऊ शकेल!