Aug07
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 7th August 2016
नामस्मरणाची रीत: डॉ. श्रीनिवास कशाळीकरविद्यार्थी: सर, एका जागी बसून नामस्मरण करणे अधिक श्रेयस्कर आहे का? असे नामस्मरण कसे वाढवता येईल?
शिक्षक: हा प्रश्न फारच छान आहे! माझ्या समजुतीप्रमाणे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज आपल्याकडून आपल्या प्रकृतिधर्माला योग्य अश्या पद्धतीने, आणि प्रमाणात त्यांच्या इच्छेप्रमाणे नामस्मरण आणि त्याचा प्रसार करून घेतात. त्याचप्रमाणे नामात गोडी वाढवितात आणि तज्जन्य सद्बुद्धीद्वारे सुयोग्य कर्म (स्वधर्म) देखील करून घेतात.
त्यांच्या कृपेने आपल्या नामस्मरणात आणि स्वधर्मात निश्चित आणि सुयोग्य अशी प्रगती होत जाईल. आपण जमेल तेवढे आणि जमेल तसे नामस्मरण करत राहायचे!
विद्यार्थी: धन्यवाद सर! मला उत्तर मिळाले!