Aug09
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 9th August 2016
नामात रंगणे: डॉ. श्रीनिवास कशाळीकर नामस्मरण करता करता समजू लागते की नामस्मरण हे सोपे साधन आहे; पण “नामात रंगणे” व “समाधानी होणे” हे शब्द सोपे असले तरी प्रत्यक्षात तसे होणे ते वाटते तितके सोपे नाही!
नामात रंगणे आणि समाधानी होणे म्हणजे वास्तविक पाहता; आत्मसाक्षात्कार होणे, कालातीत व अजरामर अश्या पूर्णत्वाला जाणे, परमेश्वराच्या वा सद्गुरुंच्या म्हणजेच आपल्या अंतरात्म्याच्या इच्छेशी आणि सत्तेशी समरस होणे; म्हणजेच मुक्त होणे होय!
एकवेळ कावीळ झालेल्याला स्वच्छ दिसणे सोपे, पण नामात रंगणे व समाधानी होणे हे आमच्यासारख्या देहबुद्धीने जखडलेल्यांना अशक्यप्राय आहे! पण तरीही गुरुकृपेने हे शक्य होते ह्याबद्दल मात्र मुळीच शंका वाटत नाही!