Apr23
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 23rd April 2016
आपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात. पण आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी आपले समाधान होत नाही. कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला तरीही समाधान होत नाही.
आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होणे आणि तसे वागणे; किंवा तसे होण्याचा वा वागण्याचा प्रयत्न करणे; हेच आपल्याला समाधान देते आणि तेच श्रेयस्कर आहे!
पण ते कसे साध्य होईल?
इतर कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक गोंधळात न अडकता नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि आपल्या कळलेली/अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगणे; हेच आवश्यक आहे. त्यानेच आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अनंतरात्म्याला समाधान देणारे बदल आपल्यात आपोआप घडत जातात; आणि आपले समाधान व्हायला सुरुवात होते!
श्रीराम समर्थ!