Nov28
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 28th November 2015
अध्यात्म, विज्ञान आणि कला: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरअध्यात्म म्हणजे सत्यस्वरूप होण्याची प्रक्रिया.
सत्यस्वरूप होण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग सांगितला गेला आहे. ह्यामध्ये विज्ञान नाकारले गेलेले नाही. फक्त त्यांची मर्यादा जाणण्याची गरज अधोरखित केली गेली आहे.
विज्ञान म्हणजे सत्य जाणणे.
त्यासाठी निरीक्षण, वाचन, मनन, चिंतन, प्रयोग इत्यादी मार्ग सांगितले गेले आहेत.
पण अध्यात्म म्हणजेच सत्य स्वरूप होण्याची प्रक्रिया धी:कारली गेलेली नाही.
फक्त सत्यस्वरूप झाल्याचा भ्रम टाळण्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
कला म्हणजे सत्य हृदयाला भिडणे. हृदयाला भिडणारे सत्य जाणू नये किंवा तद्रूप होऊ नये असे कला म्हणत नाही आणि विज्ञान व अध्यात्म; सत्य हृदयाला भोडू नये असे म्हणत नाहीत; किंबहुना सत्य हृदयाला भिडणे हा कलेचा आणि विज्ञान आणि अध्यात्माचा गाभा आहे असेच म्हणतात.
विज्ञान (सत्य जाणणे), कला (सत्य हृदयाला भिडणे) आणि अध्यात्म (सत्यस्वरूप होणे); ह्या जीवनाच्या अविभाज्य बाबी आहेत.