Apr06

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 6th April 2016
नामामृत: डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपण नामस्मरण करू लागलो की एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागून; अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नाही तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्याला कळते! पण वळत नाही! पण ह्या शिकवणीचा अनुभव यथावकाश आणि गुरुकृपेने येईलच असे वाटते!
पण ह्यासाठी आपल्यालां सतत लक्षात ठेवायला हवे की; अखंड नामस्मरण हेच आणि केवळ हेच आपले साधन आहे आणि त्याशिवाय अन्य पर्याय नाही!