
स्वत:चे व विश्वाचे कल्याण म्हणजे काय?
Posted by Dr. Suhas Mhetre on Monday, 1st October 2012
आपली विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये, कार्यालये, दुकाने, आणि अगदी तुरुंग देखील नामस्मरणाने भरून जावी .आणि आपले व सर्वांचे संपूर्ण कल्याण व्हावे यासाठी आपण नामस्मरण करता करता नामस्मरणाचे महत्व विशद करणारी पुस्तके वा इतर साहित्य; स्वत:च्या क्षमते नुसार सर्वत्र पोचवणे हे माझे कर्तव्य आहे. हा माझा धर्म आहे. खरे तर हा माझा हक्क आहे, अधिकार आहे. किंबहुना ही माझी जगण्याची गरज आणि दुर्मिळ अशी सुवर्ण संधी आहे.
नामस्मरणामुळे आर्थिक मदत झाल्याची वा इतर काही चमत्कार् घडल्याची उदाहरणे देखील दिली जातात.
पण नामस्मरणाने; सत्बुद्धी, सद्विचार, सद्भावना, सत्प्रव्रुत्ती, सद्वासना, सत्सन्कल्प, सत्क्रुती, आणि आत्मनो मोक्शार्थम जगत् हिताय च; अर्थात् स्वत:चे आणि विश्वाचे कल्याण यांचा परम आनंददायी ; मार्ग प्रशस्त होतो; हेच सर्वात महत्वाचे नाही का?
स्वत:चे व विश्वाचे कल्याण म्हणजे काय?
अम्रुतत्वाची व एकात्मतेची म्हणजेच गुरुक्रुपेची अनुभूती हे अंतींम कल्याण आहे.
लोकांकडून मिळणारा मान हा मधुमेहाच्या रोग्याच्या रक्तातल्या साखरेसारखा असतो. वरवर त्याचे काही वाटणार नाही; पण तो साधनी माणसाचा घात केल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा, साधनी माणसाने मानाला भुलू नये! श्रीराम समर्थ!!!
आतील आणि बाहेरील ताण तनावामुळे निर्माण होणार्या; बेकारी, बेरोजगारी आणि कूरोजगारी (कुमार्गाचे व्यवसाय व नोकर्या, ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाचे नुकसान व हानी होते); यांचे समूळ उच्चाटन; सम्यक शिक्षणाने करता येईल. नामस्मरण आणि उत्पादकता यांचा अंतर्भाव केल्यास; शिक्षण सम्यक (परिपूर्ण, संपूर्ण) आणि चैतन्यदायी बनते, सामर्थ्यदायी बनते.
सुरुवातीला जरी अडचणी, त्रास, संकटे दूर व्हावी म्हणून किंवा अधिकाधिक सुख, अधिकार, पैसा मिळावा म्हणून नामस्मरण केले तरी पुढे पुढे ह्या सर्व बाबी बाजूला पडतात आणि गुरुक्रुपेचा (आत्मामृतानुभवाचा) अनुभव येतो. नामस्मरणाने सहज प्रवृत्ती, वासना, भावना, संकल्प, विचार आणि दृष्टिकोन शुद्ध आणि विकसित होतात व वैयक्तिक आणि वैश्विक कल्याण प्रत्यक्षात येते (पण अगदी अपेक्षा केल्याप्रमाणे किंवा अगदीच सुलभतेने नव्हे)
आत्मामृतानुभवाद्वारे; आपल्याला निस्वार्थ वृत्तीने वागता येईल का? निष्कपट मनाने मृदू बोलता येईल का? अचूक विचार, निर्भयतl, रुजुता आणि कणखरता जीवनात येईल का? आपल्या अस्तित्वातून; सम्यक आरोग्यदायी असे; अन्तस्फूर्त चैतन्याम्रुत प्रगट होईल का? होईल; तर कसे होईल?
नामस्मरणं (जप, जाप, जिकरा, सुमीरण, सिमरन, आत्मस्मरण; धर्मांधतेचा बाजार व वडीवार नव्हे); ज्या प्रमाणात वाढेल; त्या प्रमाणात; आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे, विचार, भावना, वासना, दृष्टिकोन विकसित होतील. राज्यघटना, कायदे, नियम, प्रथा, रूढी, परंपरा विकसित होतील, निर्दोष होतील. करप्रणाली, करवसुली आणि कराचा विनियोग; इत्यादी सुयोग्य होतील. असे झाल्याने कर बुडवेपणा, कर चोरी आणि काळा पैसा
कमी होईलच. पण त्याच बरोबर कुमार्गाने,लबाडीने,किंवा लाचारीने काळाकुट्ट पैसा मिळवण्याची पाळी येणार नाही अशी व्यवस्था देखील विकसित होईल.
हे कसे होऊ शकेल याच्या स्पष्टीकरणासाठी माझी पुस्तके व लेख (इंग्रजी, मराठी आणि हिंदी) खालील लिंक वर फ्री डाऊन लोड साठी उपलब्ध आहेत.
drshriniwasjkashalikar.blogspot.in
namasmaranmarathi.blogspot.in
www.freestress.webs.com
www.superliving.net