Jul26
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Thursday, 26th July 2012
आयुष्यातल्या असन्ख्य बर्या वाईट अनुभवानंतर जेव्हा जगण्यातले स्वारस्य निघून जाते तेव्हा फक्त नामच नवसन्जीवनी देते. तेव्हा नामाची महती पटते. नाम हेच संपूर्ण जीवनाचा हेतू, मूलाधार आणि ऊर्जास्रोत आहे हे पटते. पण त्यासाठी सुरुवातीपासूनच नामात राहणे आवश्यक आणि श्रेयस्कर आहे. म्हणून केवळ घराघरामध्ये आणि देवळातच नव्हे; तर शाळा कॉलेजामध्ये, रुग्णालयाअमध्ये, तुरुंगात, कार्यालयांमध्ये व एकंदरीत सर्वत्रच नामस्मरणाची प्रथा सुरू व्हावी यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.