Aug01
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 1st August 2012
ACCOMPLISHMENT: DR. SHRINIWAS KASHALIKARJust like food, clothes, shelter; other passions and emotions are also natural. The urge and motivation for global welfare is also natural. Like wise it is also true that there can be variations in this. But all these culminate in unifying love, buoyancy and fulfillment; through the process of self realization (NAMASMARAN). No only the followers of different cultures and traditions but also the atheists can verify this through their experience; without "belief or disbelief".
अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी प्रमाणे इतर वासना, भावना देखील नैसर्गिक असतात. लोककल्यानाची तळमळ देखील नैसर्गिक असते. त्यासाठी विचार करणे आणि एकाद्या ध्येयाने प्रेरीत होऊन काम करणे देखील नैसर्गिक असते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या गरजा, ध्येये, मार्ग, आणि वृत्ती वेगळ्या असू शकतात हे ही खरे. परंतु अशा विविध गुण दोष पूर्ण नैसर्गिक परंतु सापेक्ष जीवनांना; एकात्मतेची सहर्ष प्रसन्नता, सार्थकता, पूर्णता आणि कृतार्थता त्रिकालातीत पूर्णत्वात समारसण्याच्या प्रक्रियेतून म्हणजेच नामस्मरणातून येते. केवळ विविध आचार विचाराच्याच नव्हे तर नास्तिकानी देखील यावर विश्वास किंवा अविश्वास न ठेवता याची प्रचीती घेऊन पाहायला हरकत नाही.