Jun25
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 25th June 2013
नामसंकल्पाचे महत्व: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरनामस्मरण करणे ही प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची क्रिया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रक्रिया आहे.
त्यामुळे आपल्या अंतर्मनातील आणि जागृत अवस्थेतील कितीतरी विचार, भावना, वासना; या प्रक्रियेबद्दल संशय, कंटाळा, दुर्लक्श इत्यादी उत्पन्न करतात.
त्यामुळे आपले नामस्मरण नकळत कमी होते. त्यातली आस्था कमी होते. ओढ कमी होते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही.
इतर बाबी समाधान देत नसल्यामुळे मनाची खिन्नता पुष्कळदा फारच वाढते. मनामध्ये पोकळी तयार होते.
अश्यावेळी सदगुरूच आपल्यासाठी "नामसंकल्पाची योजना" उपलब्ध करतात.
अश्यावेळी; "नामसंकल्पाने अहंकार वाढेल, सनक्ल्पातच सारे लक्ष जाईल, नामातली गीडी कमी होईल"; वगैरे शंका प्रकर्षाने येतात. सामूहिक नामसंकल्प असेल; तर "इतरांच्याकडे कश्याला प्रदर्शन करा?" अशी शंकाही येते.
अश्यावेळी; इतर सर्व फडतूस, क्षुद्र, संकुचित, अधोगामी; विचार, भावना, वासना आणि संकल्प; यशस्वीपणे बाजूला सारण्यासाठी "नामसंकल्प" हा रामबाण उपाय आहे. त्याच्यामुळे मनातली पोकळी गुरूंच्या आठवणीने, त्याच्यावरील भक्तीने आणि तज्जन्य उत्साहाने ओसंडून भरून जाते. खिन्नता निघून जाते. रोजच्या जीवनाला एक हेतू मिळतो. सद्गुरुंची गोड ओढ आणि नामसंकल्पाचे चैतन्याधिष्ठान यानी प्रत्येक ( एरवी रटाळ आणि कंटाळवाणा) दिवस उत्साहवर्धक उत्सव बनतो. क्रुतार्थ बनतो.