Sep19

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Saturday, 19th September 2015
नामस्मरण करणेच महत्वाचे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरविद्यार्थी: लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून ज्याप्रमाणे मधाचे बोट लावतात तसेच नामस्मरणामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादींची योजना केली गेली आहे का?
शिक्षक: निश्चित! �देव�, �परमात्मा�, �ब्रह्म�, परमेश्वर; �राम�, �कृष्ण�, �शिव�, इत्यादी वेगवेगळ्या शब्दांचा किंवा नावांचा गर्भितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामाच्या द्वारे जी वस्तू ओळखली जाते ती अनादी आणि अनंत वस्तू. ह्या अर्थाने �नाम� हे अनादी आणि अनंत आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्वांच्या अंतर्यामी आणि सर्वांच्या बाहेर आहे. त्याची सत्ता बलवत्तर आहे असे संत म्हणतात.
परंतु; धर्म हा सर्वांच्यासाठी असल्यामुळे; आणि आपण सर्वसामान्य लोक; विषय सुखात रमत असल्यामुळे; अखंड नामस्मरण करणे प्रत्येकाला शक्य नाही. हे लक्षात घेऊनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ ठरवले गेले आणि स्वीकारले गेले. त्याअनुरोधानेच; कुंभ मेळ्यासारखे मेळे, तीर्थयात्रा, वाऱ्या, उत्सव, सण, व्रते, महापूजा, नैवेद्य, महाप्रसाद, भोग, भजने, आरत्या; इत्यादीं प्रत्येक मनोवेधक, रंजक, आकर्षक आणि भव्य दिव्य बाबीत नामस्मरण ठेवून; क्रमाक्रमाने जीवनातले सर्व रस उपभोगत अखेर; अंतीम सत्य अनुभवण्याची सोय केली गेली.
एक लक्षात ठेवणे जरूर आहे. अंतीमत: नामस्मरणात रमलेले साधू; पराकोटीचे निस्पृह असून वस्तुनिरपेक्ष आनंदच उपभोगत असतात. त्यांना कोणत्याही बडेजावाची आणि बाह्य उपचारांची गरज नसते. आंतरिक चैतन्याने ओतप्रोत भरल्याने आणि सर्व सामर्थ्य अंगी असल्याने; ते कोणाचेच मिंधे नसतात. त्यांना कसलीच गरज नसते! ह्या परमोच्च अवस्थेला �नामात गोडी येणे�, किंवा �नामात रमणे� म्हणतात!
विद्यार्थी: याचा अर्थ; सर्वात श्रेष्ठ आणि मुख्य जर काही असेल तर नामस्मरण आहे, नामाची गोडी लागणे आणि नामात रमणे आहे. पण हे विधान सर्वांना लागू पडते का? जरा समजावून सांगा ना!
शिक्षक: अर्थातच! वीजपुरवठा खंडित झाला की ज्याप्रमाणे सर्वच बल्ब प्रकाशहीन आणि निरुपयोगी बनतात त्याप्रमाणे चैतन्यविस्मृतीमुळे; आपण सर्वच जण त्या चैतन्याला पारखे होतो आणि निस्तेज आणि दुबळे बनतो. विशेष म्हणजे; त्या चैतन्याची तहान आपल्या सर्वांना लागलेली असताना देखील; त्याच्या विस्मृतीमुळे आपण तृषाक्रांत राहून �रडत� असतो, किरकिरत असतो! चैतन्य प्रत्येकात आहे, त्याची तहान सर्वांना आहे आणि त्याच्या विस्मृतीची बाधाही सर्वांना आहे; म्हणूनच चैतन्यस्मरणाचा वा नामस्मरणाचा मार्ग आपल्या सर्वांसाठी आहे!