Jan06
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 6th January 2016
नामस्मरण आणि समाधान: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरआपल्या शरीरातील असंख्य प्रक्रियांच्या अनुसार आपली दृष्टी, आपल्या संवेदना, आपल्या प्रतिक्रिया ठरतात.
आपल्या शरीरातील असंख्य प्रक्रिया, आपल्याला नेहमी गरजवंत बनवतात. लाचार बनवतात. कधी कधी तर हुकुमशहा किंवा गुन्हेगार बनवतात. ह्या प्रक्रियाना आपण वासना म्हणतो.
नामस्मरणाने ह्या सर्व प्रक्रिया हळू हळू पण निश्चितपणे उन्नत होत जातात आणि आपली दृष्टी, संवेदना आणि प्रतिक्रिया; हळू हळू अचूक आणि कृतार्थ होतात आणि समाधानात परिणत होतात.
ह्यालाच मोक्ष वा मुक्ती म्हणतात.