Mar28
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 28th March 2016
जीवनाचे सार्थक: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकरवास्तविक; आपले अंतर्बाह्य व्यापणारे चैतन्य आपल्या अंत:करणातल्या आकाशात निरंतर बरसत असते. मनुष्य कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, देशाचा, वंशाचा, व्यवसायाचा वा वयाचा असो, याला अपवाद असत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य व्याधीग्रस्त असो वा निरोगी, अपंग असो वा धडधाकट, अशक्त असो वा सशक्त, व्यसनी असो वा निर्व्यसनी, अपराधी असो वा निरपराधी आणि गरीब असो वा श्रीमंत याला अपवाद असत नाही. अगदी जगभरातल्या बलाढ्य देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि सेनानी देखील याला अपवाद असत नाहीत!
"आपण रोज असंख्य बऱ्या-वाईट गोष्टी करतो. ह्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला सत्याकडे पोचवतात; म्हणजेच “सत्कारणी” लागतात? शिक्षण, क्रीडा, करमणूक, व्यापार, उद्योग, शेती, आरोग्यसेवा, संगीत, नाट्य; ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात! म्हणजेच त्यांत घातलेले पैसे, श्रम आणि वेळ वाया जातात, व्यर्थ जातात, फुकट जातात! नामस्मरण म्हणजेच चैतन्याचे, सत्याचे स्मरण. त्याची जोड मिळाली की, आपली प्रत्येक कृती सत्कारणी लागते!"