Apr08
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 8th April 2016
अनुभव: डॉ. श्रीनिवास कशाळीकरमाझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा अनुभव असा की; आपल्या कुवतीनुसार प्रथम अस्वस्थता, मग अभ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.