World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
May18
जग सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळी�
जग सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपल्या अंतर्मनात पुष्कळदा एक प्रकारची हुरहूर असते. आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक असू शकेल आणि असावे असे वाटत असते.

पण आपण जर हे लक्षात घेतले की हे जे आपल्याला वाटत असते, ते ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) �वाटत� असते, तर मग जगाला काय �वाटावे� हे देखील ईश्वरेच्छेनेच नाही का ठरणार?
तसेच आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणभंगुर असून, आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे ईश्वरेच्छेने �सुधारत� असते हे खरे नाही का?

म्हणूनच; �जग सुधारणे� म्हणजे �आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी बाजूला ठेवून ईश्वरेच्छेशी तद्रूप होणे� होय.

ईश्वरेच्छेनेच आपण नामस्मरण करीत असल्यामुळे आणि त्याचा प्रसार करीत असल्यामुळे; कुणी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे ईश्वरेच्छेनेच ठरते; आणि हे नामस्मरण करता करता समजते आणि आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होतो!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5413)  |  User Rating
Rate It


Browse Archive