May23
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Monday, 23rd May 2016
कुटुंबाचे स्वास्थ्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकरआपले आई वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; सर्व जण सुखी आणि स्वस्थ असावी असे आपल्याला वाटते ना? म्हणजेच आपल्या अवती-भोवती प्रसन्न वातावरण असावे असे वाटते ना?
पण आपली शारीरिक क्षमता, आपली आर्थिक कुवत, आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपले राजकीय वजन इत्यादी कमी कमी होत चालल्या की आपण निकामी झाल्याच्या जाणीवेने आपण असहाय्य आणि खिन्न होत जातो! आपले आप्त आणि स्वकीय जर दूर राहात असले तर आपल्याला हे अधिकच जाणवते!
पण ह्या क्षणी सावरले पाहिजे! आपले आई-वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; थोडक्यात सर्व जण सुखी आणि स्वस्थ व्हावे यासाठी अगदी असहाय्य अवस्थेत देखील आपल्याकडे साधन आहे!
ते साधन म्हणजे नामस्मरण! त्यानेच आपल्या हृदयातील ईश्वर प्रगट होऊन ह्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वास्थ्याचा वसंत अंतर्बाह्य फुलवतो!