Jun15
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Wednesday, 15th June 2016
वैश्विक आणि वैयक्तिक गुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज ह्यांनी म्हटले आहे की
गुरुकडून घेतलेले नाम
पावन करील जगास
हा ठेवावा विश्वास
राम कृपा करील खास
पण आम्हाला ह्याची प्रचीती का बरे येत नाही?
कारण सर्वकाही माहीत असूनही आम्हाला नामामध्ये म्हणजेच रामामध्ये तादात्म्य नाही. निरंतर वैश्विक आणि वैयक्तिक गुरुकृपेची (म्हणजेच रामकृपेची व नामकृपेची) अखंड प्रचीती नाही. आम्ही स्वत:विषयीच्या आणि इतरांविषयीच्या आमच्या ढोबळ आडाख्यांनाच धरून बसतो आणि ते जसे जसे चुकत वा बरोबर ठरत जातात तसे तसे खिन्न वा उन्मादी होत राहतो! कारण आमचे नामस्मरण कमी पडते!
पण नामस्मरण जसे जसे वाढत जाईल आणि अंतरंगात खोल जाईल तसे तसे निरंतर वैश्विक आणि वैयक्तिक गुरुकृपेचे आमचे भान आणि आमचा अनुभव नि:संशय होत जाईल हे नक्की! राम कर्ता आहे आणि आमच्या कल्पनेपलिकडे अचूक आणि अंतरंग तृप्त करणारा आहे, ह्याची कृतज्ञ जाणीव होऊ लागेल हे नक्की! कारण वैश्विक आणि वैयक्तिक समाधानाचा वसंत ऋतू येणे अटळ आहे, अपरिहार्य आहे!
श्रीराम समर्थ!