Jun17
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 17th June 2016
तर जीवनाचे सोने होते: डॉ. श्रीनिवास कशाळीकर सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केले कि माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे कि आती केले कि माती नाही तर जीवनाचे सोने होते . नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"
मला कळलेला याचा अर्थ असा की नामस्मरणाने आपण आपल्या आत अस्तित्वाच्या गाभ्याकडे पोचत असतो, जिथे परमेश्वराची म्हणजेच सद्गुरूंची वस्ती असते! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुले काहीही बिघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! उलट आपण परमेश्वराच्या म्हणजेच सद्गुरुंच्या म्हणजेच स्वत:च्या सच्चिदानंदस्वरूपाच्या (शाश्वत समाधानाच्या) अधिकाधिक निकट पोचत असतो! यालाच "परमेश्वराला तुमच्या जवळ राहावे लागते" असे सद्गुरू म्हणतात.
यातच आपले, आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण विश्वाचेही कल्याण असल्याने यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात!
वाचन लेखनाने आपला निर्धार बळकट होतु शकतो, पण केवळ तेवढा पुरत नाही! याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकतो!
श्रीराम समर्थ!