Jul05

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 5th July 2016
नाम मुरणे म्हणजे काय: डॉ. श्रीनिवास कशाळीकरविद्यार्थी: सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, �नाम खोल गेले पाहिजे, नाम मुरले पाहिजे�! ह्या त्यांच्या सांगण्याचा नेमका अर्थ काय?
शिक्षक: आपल्याला वेदना झाली की आपण ओरडतो. दुर्गंध आला की नाक मुरडतो. खाताना खडा लागला की वैतागतो. घरातले कुणी आजारी असले की आपण हवालदिल होतो. बस आली नाही की अस्वस्थ होतो. आर्थिक नुकसानीने खचतो. कुणी पाणउतारा केला की आपण खवळतो किंवा खिन्न होतो. सामाजिक अवहेलना, आजार आणि मृत्युच्या भीतीने तर आपले हृदय धडधडू लागते! याउलट क्षुल्लक यशाने किंवा आर्थिक फायद्याने किंवा फायद्याच्या आमिषाने देखील आपण एकदम हुरळून जातो!
ह्या क्रिया क्षणार्धात घडतात! नामस्मरणाच्या सुरुवातीच्या काळात त्या टाळता येत नाहीत. एवढेच नव्हे तर, त्याबद्दल आपल्याला फारसे काही वाटत देखील नाही! उलट आपण �ह्या बाबी नैसर्गिक आहेत� असे म्हणून स्वत:चे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो.
पुढे पुढे; अश्या क्रिया घडल्यानंतर खेद होतो. आपण चुकल्याची लाज वाटते! नामस्मरण वाढले पाहिजे यांची तीव्र जाणीव होते!
पण, नाम अधिक खोल गेले किंवा मुरले, तर अश्या क्रिया घडणायापुर्वी आपल्या मनात नामस्मरण येते, राम कर्ता ही भावना येते आणि त्या क्रियांचा परिणाम पूर्वीसारखा तीव्र राहत नाही!
नाम खोल जाण्याच्या व मुरण्याच्या प्रक्रियेतली ही एक पायरी समजायला हरकत नाही!
श्रीराम समर्थ!