Jul26
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 26th July 2016
लोकशाही निवडणुका आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनिवडणुका आणि लोकशाही ह्या सर्व अनिष्ट बाबींवरील रामबाण इलाज आहेत असे आम्हाला खरोखर वाटते किंवा तसे आम्ही भासवतो..
पण खोलात जाऊन पाहिले तर; निवडणुका आणि लोकशाही ही देखील इतर साधनांप्रमाणे उत्तम समाज आणि व्यक्ती घडवण्याची साधने आहेत. पण इतर सर्व साधनांकडे (उदा. व्यक्ती आणि समाजजीवनातील शिस्त, जबाबदारी, चातुर्य, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, चिकाटी, धैर्य, सहकार्य, सहिष्णुता, दयाळूपणा, नि:पक्षपातीपणा) दुर्लक्ष करून त्यांचा प्रमाणाबाहेर उदोउदो केला तर ते घातक ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाची बाब म्हणजे सदसदविवेकबुद्धीला स्मरून निर्भयपणे निवडणुकीत प्रचार करण्याची, मतदान करण्याची आणि निवडून आल्यास व्यक्ती आणि समाजाचे हित जपण्याची क्षमता अंगी बाळवणे.
हे कसे शक्य होईल?
ह्यासाठी, सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशाचा सारांश प्रपंचातील कर्तव्यात भगवंताचे स्मरण आणि बहुतेक सर्व दृष्ट्या महापुरुषांच्या उपदेशाचा देखील सारांश असा आहे की नामस्मरण करा आणि अंतरात्म्याशी वा हृदयस्थ परमेश्वराशी एकरूप होत होत तज्जन्य विश्वकल्याणकारी आणि सामर्थ्यदायी प्रेरणेतून कार्य करत आयुष्याचे सार्थक करा!
मग व्यक्ती आणि समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी निवडणुकांच्या अगोदर, निवडणुकांच्या दरम्यान आणि निवडणुकांच्या नंतर अगदी निरंतरपणे नामस्मरणाला सर्वोच्च प्राधान्य नको का द्यायला?