Aug05
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 5th August 2016
वासना आणि नामस्मरण: डॉ. श्रीनिवास कशाळीकरसद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर म्हणतात, “आपले मन वासनेच्या आधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते”.
आपल्याला खरे तर शाश्वत आनंदाची, म्हणजेच परमेश्वराची, म्हणजेच सद्गुरूची, म्हणजेच नामाची, म्हणजेच आपल्या अंतरात्म्याची ओढ जाणवत असते.
पण तरीही; ती जाणवत असताना देखील आपले मन आपल्याला आवरत नाही! सतत नामस्मरण चालू असताना देखील; कधी वेदना, कधी छंद, कधी आवड, कधी इच्छा, कधी लळा, कधी करमणूक, कधी दया, कधी आकर्षण, कधी चीड, कधी लालसा, कधी जिव्हाळा, कधी ध्येय, कधी आदर्श, कधी भीती तर कधी इंद्रियजन्य सुखांची अनिवार ओढ; अश्या वेगवेगळ्या फसव्या रुपांत आणि निरनिराळ्या मायावी पद्धतींनी वासना आपल्या मनाला तिच्या कह्यात घेते आणि पुन्हा पुन्हा थप्पडा मारून लाचार आणि असहाय्य बनवते!
खरोखरच अश्या वेळी असे वाटते की ज्याला आपण आपले सर्वस्व समजतो, त्या आपल्या कल्पना, आपले विचार, आपले ध्येय, आपल्या आस्था; सद्गुरुआज्ञापालनात अडसर बनत आहेत! म्हणूनच ते सर्वच्या सर्व सद्गुरुचरणी समर्पित होऊन सद्गुरुंच्या इच्छेमध्ये विलीन व्हावे!
श्रीराम समर्थ!