Aug07
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 7th August 2016
वाहतूक अपघात: डॉ. श्रीनिवास कशाळीकरतणावाचे जर नीट व्यवस्थापन केले नाही तर, आपल्या आतल्या आणि बाहेरच्या परिस्थितीवरील आपले नियंत्रण, एकवाक्यता, सुसंवाद, सुसंबद्धता; कमी कमी होत जातात. यामुळे आपले विचार, मन, अंतर्मन, वासना सदोष होत जातात आणि छोट्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री बेसुमार वाढवणारी आणि बस, ट्रेन, जहाजे यांसारख्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री फारच अपुरी करणारी धोरणे आपण राबवू लागतो.
यामुळे
१. शिस्तबध्द आणि सुयोग्य वाहतूक अशक्यप्राय होते. वेळेचा बेसुमार अपव्यय होतो.
२. इंधनाचा वापर आणि आयात खर्च वाढतो. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई वाढते.
३. रासायनिक प्रदूषण वाढते.
४. रस्त्यांची दुरावस्था अधिक प्रमाणात होते व रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढतो.
५. ध्वनी प्रदूषण वाढते.
६. अपुऱ्या बसेस आणि ट्रेन्स वर अतिरिक्त ताण पडून; तिथे भांडणे, गुन्हे आणि अपघात वाढतात.
७. रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे चालकावरील तणाव वाढतो आणि ड्रायविंग अधिकाधिक सदोष होते.
८. यामुळे रस्त्यावरील अपघातात आणि गुन्ह्यांत भर पडतेच पण शिवाय, वैद्यकीय सेवा, अग्निशमन, कायदा व सुव्यवस्था वगैरे आपत्कालीन मदतकार्य पोचण्यात उशीर होतो.
९. अधिक वाहनांमुळे वाहन विमा, पंजीकरण, परिवहन व्यवस्था इत्यादी अनुत्पादक कामे आणि खर्च वाढतात.
१०. अधिक वाहने वाढल्यामुळे अविनाशी कचरा वाढतो!
११. रस्त्यांची गरज अधिक वाढल्यामुळे सिमेंट कोंक्रिटीकरण वाढते. झाडे व अनाच्छादित भूभाग कमी होतो. यामुळे पाणी जिरणे कमी होते. पाणी वाया जाते.
१२. पर्यावरण पोषक सायकली चालवणे कठीण होते.
१३. अश्या तऱ्हेने तणावातून जन्म घेणाऱ्या एका चुकीच्या धोरणातून केवळ वाहतूक अपघातच नव्हे, तर इतरही अनेक तणाव कारक समस्या तयार होतात.
नामस्मरणातून (आत्मज्ञानाच्या साधनेतून) तणावमुक्ती होऊ लागते आणि निस्वार्थी विचार, प्रेरणा, भावना, संकल्प, आस्था आणि दृढनिश्चय उगम पावतात. यामुळे आपल्याला अश्या परिस्थितीत; सर्वप्रथम आणि प्राधान्याने बसेस आणि ट्रेन्स सारख्या मोठ्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री यांचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्याची आणि छोट्या वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याची धोरणे राबवण्याची सुबुध्दी होते आणि क्षमता येते.