Aug09
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Tuesday, 9th August 2016
जगाची सर्वश्रेष्ठ सेवा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर“तुमचा स्वत:चा आत्मसाक्षात्कार हीच तुमच्याकडून होऊ शकणारी जगाची सर्वश्रेष्ठ सेवा होय” असे श्री. रमण महर्षि म्हणाल्याचे वाचनात आले. नक्की खरे की खोटे माहीत नाही.
पण जर हे खरे असेल, तर ते मनाला पटते. शंका वाटत नाही. कारण आत्मसाक्षात्कार हीच जीवनाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे असे अगदी मनापासून वाटते.
पण आत्मसाक्षात्कार हा आम्हाला फक्त ऐकून किंवा वाचून माहीत आहे. फार तर तहानलेल्याने जशी तहानेवरून पाण्याची कल्पना करावी तशी आम्ही त्याची कल्पना करू शकतो!
मग आम्ही काय करावे? जगाची सेवा कशी करावी?
आमचे सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी त्याचे उत्तर पूर्वीच दिले आहे. ते म्हणतात, "गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास."
आम्ही नामस्मरण (आत्मसाक्षात्काराचे सर्वांना शक्य आणि सुलभ असे साधन) अंगिकारावे आणि स्वत:ला कळत जाणारे नामाचे विश्वकल्याणकारी महत्व इतरांना सांगत जावे.
श्रीराम समर्थ!