Aug28
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 28th August 2016
गोंदवलेकर महाराज म्हणतात “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”.डॉ. श्रीनिवास कशाळीकरश्री. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, “नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे” आणि “सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच”. याचा अर्थ नामस्मरण हीच जीवनातली सर्वोच्च कृती! कारण सद्गुरूची भेट आणि सद्गुरूचे प्रेम हेच जीवनात मिळवायचे असते.
आजारपणात जीवन संपत आले की; ऐहिक यशाने समाधान झालेले नसल्यामुळे, इतर काय करतात आणि इतरांनी काय मिळवले, ह्या भ्रमात आपण गुरफटतो. अश्या वेळी इतरांच्या (आणि आपल्याही) मागची नामाची सत्ता आपण विसरतो आणि नामाचे सर्वोच्च महत्व देखील विसरतो. जीवन व्यर्थ गेले असे वाटते! नकळत आपण नामाचा आणि सद्गुरुंचा अनादर करतो!
नाम म्हणजेच सद्गुरू आणि नामावर प्रेम करणे म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करणे असल्यामुळे नामस्मरणाएवढे श्रेष्ठ दुसरे कांहीही नाही. नामाशिवाय काहीही मिळवायचे नाही. नाम घेतांना मृत्यू आला तर ते खरे सर्वश्रेष्ठ भाग्य; कारण तीच गुरुभेट, तेच जीवनाचे सार्थक आणि तेच सर्वश्रेष्ठ साफल्य!
म्हणूनच आत्यंतिक वेदना, हतबलता आणि मृत्यूसमयीसुद्धा नामाचा विसर पडू नये हीच सद्गुरुचरणी कळकळीची प्रार्थना.