Sep16
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 16th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक ४. सर्वंकष वैयक्तिक आणि वैश्विक कल्याणाचा हा आविष्कार प्रत्यक्षात कसा येईल हे आता जाणून घेऊ.
मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे; अचेतन झालेले शरीर ज्याप्रमाणे रक्तपुरवठा नीट होताच पूर्ववत सचेतन आणि कार्यरत होते तसेच हे होणार आहे. सत्याची अनुभूती ही गंगोत्री आहे. तिच्यापासून सदसद्विविवेक, सद्बुद्धी, सत्प्रेरणा, सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सदिच्छा, सत्कार्य आणि सुसंवाद यांच्या नवसंजीवनीचा प्रवाह सुरु होतो. ह्या नवचैतन्यदायी प्रवाहाने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सद्गुणांचे बल वाढते आणि त्यांचे आधिपत्य आणि सत्ता यांचा अंमल सुरु होतो. यातून जीवनाच्या सर्व क्षेत्रात सदभिरुची, सहिष्णुता, समंजसपणा, सहकार्य, समाधान, स्वास्थ्य यांचे प्रकटीकरण होऊ लागते. यातून लोककल्याणकारी धोरणे, योजना, कायदे, नियम आणि संकेत जरुरीप्रमाणे पुनर्रचित व कार्यरत होतात. अशा तऱ्हेने विष्णुसहस्रनाम (नामस्मरण) ही आत्मज्ञानाची आणि पर्यायाने समृदधीची गंगोत्री आहे. यामध्ये वैश्विक उर्ध्वगामी क्रांतीचे बीजामृत आहे. स्वात्म्यवादी क्रांतीचा उर्जास्त्रोत आहे. यामध्ये आत्मज्ञानी महापुरुषांचे प्रेरणास्त्रोत आणि स्फुर्तीस्त्रोत आहेत. त्याचप्रमाणे पसायदानाची पूर्ती आहे.