Sep18
Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Sunday, 18th September 2016
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर लेखांक १३.
अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम्
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदु:खातिगो भवेत् -८.
भीष्माचार्य पुढे म्हणाले, “उत्पन्न होणे, वाढणे, टिकून राहणे, बुद्धिभ्रंश होणे, क्षीणता येणे आणि नाश पावणे असे सहाही विकार नसलेला म्हणून अनादिनिधनं असा, चराचराचा आणि जाणीवेच्या सर्व पातळ्यांचा स्वामी असल्यामुळे लोकाध्यक्षं असा, सर्वान्तर्बाह्य विश्व आणि जाणीवा व्यापणारा म्हणून विष्णू ह्या नावाने ओळखला जाणारा आणि सर्व सत्ताधीश असल्याने सर्वलोकमहेश्वम् असा ईश्वर; निरंतर स्तुती करण्यास म्हणजे उपासना करण्यास सर्वतोपरी योग्य आहे. ह्या सच्चिदानंदाच्या अशा सहवासामुळे, देहबुद्धीजन्य (उत्पन्न होणे, वाढणे, टिकून राहणे, बुद्धिभ्रंश होणे, क्षीणता येणे आणि नाश पावणे) अशा सर्व दु:खांपासून जीवाला मुक्ती मिळते.