World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000071
PAGE HITS0080466

नामस्मरण आणि सावधानता: डॉ. श्रीनिवास कशाळी
नामस्मरण आणि सावधानता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरण करणाऱ्या साधकाने सावध असले पाहिजे असे कुणी म्हणाले की ते आपल्याला नकोसे वाटते. कारण, आम्हाला सावधानता ही शांती, विश्रांती, विसावा, आराम यांच्या विरुद्ध वाटते.

असे का होते?

याचे कारण आपल्याला जीवनसंघर्ष नको असतो! दगदग नको असते! आपल्याला आहे त्या परिस्थितीतून पळ काढायचा असतो! आपल्याला पळपुटा आळस हवा असतो! असा पळपुटा आळस म्हणजेच आपल्याला विश्रांती वाटते! किंबहुना तशी आपली पक्की खात्री असते! आपल्याला अश्या आळसाची सवय झालेली असते!

पण आपले आयुष्य आणि परिस्थिती तर सतत आणि वेगाने बदलत असते! साहजिकच आळसामुळे आपण मागे मागे पडत जातो आणि आयुष्याच्या अखेर आपल्याला पोकळी जाणवू लागते आणि रितेपणा जाचू लागतो! आळसापायी आपल्याला पश्चात्तापच होतो आणि समाधान दूरच राहते!

पण मजेची बाब म्हणजे आपल्याला सुधारायचे देखील असते; स्वत:ला आणि इतरांना देखील!
हे असे का होते?

कारण आहे ती परिस्थिती आपल्याला पसंत नसते! आश्चर्य म्हणजे यालाही कारण म्हणजे आपला पळपुटा आळसच होय! जे आहे त्यात आम्हाला समाधान नसते. कारण आमचे “हवे-नको”पण! प्रत्येक बाबतीत आम्हाला तक्रार करायची सवय झालेली असते! साहजिकच आपल्यामध्ये आणि परिस्थितीमध्ये कितीही बदल झाला तरी आमची तक्रार कायम असते!

गुरुकृपेने सतत नामस्मरण होऊ लागले की हळु हळु आळस कमी कमी होत जातो! सावधानता अंगी बाणू लागते. आणि स्वत:ला, इतरांना आणि परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपण सावध होतो! आपले जडत्व आणि संकुचितपणा अर्थात आपला क्षुद्र अहंकार आपल्याला अक्षरश: क्षणोक्षणी आणि प्रत्येक बाबतीत तक्रार करायला भाग पाडतो आहे हे ध्यानी येऊ लागते!

ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया!

श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4809 )  |  User Rating
Rate It

THE GREATEST SERVICE: DR. SHRINIWAS KASHALIKAR
THE GREATEST SERVICE: DR. SHRINIWAS KASHALIKAR

"Your own self-realization is the greatest service you can render the world." ~ Sri Ramana Maharshi

There is no doubt about this; in terms of conviction.

But Self realization is merely "known" to most of us; by "missing" it! This is like "knowing water" by virtue of thirst! Hence; most of us have to go on rendering relatively “lesser” service in the form of; practice and promotion of NAMASMARAN (The universal and most democratic way of self realization) and its globally benevolent; powerful role in holistic renaissance (SWADHARMA); till we are ultimately able to render the greatest service in terms of our own self realization!

Our Sadguru Shri Brahmachaitanya Maharaj Gondavalekar said, “Trust that the practice of NAMASMARAN as prescribed by Guru would emancipate the universe! Lord Rama would bless!”
(ORIGINAL MARATHI :"गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास." श्री. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज)

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5276 )  |  User Rating
Rate It

प्रवास नामस्मरणाचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
प्रवास नामस्मरणाचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

नामस्मरणाचा अभ्यास करताना एकदम काही आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आपण सामान्यच असतो. आतील आणि बाहेरील जगाचे आपल्यावर बरे-वाईट परिणाम होतच असतात
.
त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की; सरकारने अश्या योजना आखाव्या, अशी धोरणे राबवावी, असे कायदे आणि नियम करावे की जेणेकरून माझा कोंडमारा होणार नाही, मी गुदमरणार नाही, माझी कुचंबणा होणार नाही. माझे जगणे हलाखीचे आणि अशक्यप्राय होणार नाही आणि मी असहाय्य होणार नाही! कायदे आणि नियम मोडायची मला गरज पडणार नाही. उलट, हे कायदे पाळल्यामुळे माझ्या अंतरात्म्याचे समाधान होत राहील आणि जीवनाची कृतकृत्त्यता, कृतार्थता आणि सार्थकता झाल्याची जाणीव होत राहील!

पण असे घडताना दिसत नाही! काय करावे हे आपल्याला सुचत नाही! आपण खिन्न होतो. कधी सवंग आणि संकुचित स्वार्थी सुखात समाधान मानण्याचा तर कधी छोट्या मोठ्या सेवाभावी कामात मन रमवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहतो.

पण आपली वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या सद्गुरूंचे, ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांचे वचन, “गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास” पुन्हा पुन्हा लक्षात आणून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे!

चिकाटीच्या नामस्मरणाने कालांतराने जाणवू लागते की सरकार सरकार असे ज्याला आपण म्हणतो, ते देखील नामाच्या सत्तेखालीच वावरत असते! वैयक्तिक आणि सामाजिक प्रारब्धाच्या नियमांनुसार सारे काही नामाच्या सत्तेनेच घडत असते! नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात!
सतत नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच ह्या समाधान देणाऱ्या वास्तवाचा अनुभव येतो!

श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4900 )  |  User Rating
Rate It

गुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीक
गुरुंची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

शंका:
नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणि अमरत्वाचा अनुभव कुणाला आणि केव्हा येईल, हे सांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळेळे नामस्मरण करताना आपल्या चिकाटीची कसोटी लागते, आणि धीर सुटू शकतो हे खरं आहे ना?

समाधान:
होय. हे अगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) विस्मृतीत जातो आणि त्यामुळे; विषयांकडे आकर्षित होत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो. इंद्रियगम्य स्थूल विषय आणि दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा (म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!

पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!

श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4923 )  |  User Rating
Rate It

सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महार
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, "उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही,म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते.”
उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
नामात रंगण्याच्या अगोदरची पायरी म्हणजे नामाचा ध्यास, अखंड नाम घेणे, सतत नामाबद्दल बोलणे, कायम नामाबद्दल लिहिणे, नामाशिवाय काहीही न सुचणे, किंवा नामाचे वेड लागणे! नामात रंगणे म्हणजे आपले सर्व प्रकारचे हवे नकोपण पूर्णपणे संपणे! एका अर्थाने ही पूर्ण शरणागतीच होय. ही कठीण बाब आहे खरी, पण गुरुकृपेने नामस्मरण वाढत जाणे आणि ती अवस्था येणे अपरिहार्य आहे, त्याला पर्याय नाही!
श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4661 )  |  User Rating
Rate It



None
To
Scrap Flag
Scrap