World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000071
PAGE HITS0080476

BENEVOLENT GLOBAL SPRING: DR. SHRINIWAS KASHALIKAR
BENEVOLENT GLOBAL SPRING: DR. SHRINIWAS KASHALIKAR

NAMASMARAN is an act of connecting with or uniting with one's true self (which is the same as the SELF of universe). It is practiced in different ways in different traditions and is the fountainhead of universally benevolent perspectives, thoughts, policies, plans, motivations, urge and actions!

Indeed it is an incoming benevolent global spring; as predicted by Sadguru Brahmachaitanya Shri Gondavalekar Maharaj over hundred years ago and keeps inspiring billions for last one and half century!

Blessed, are those of us, who are enabled to recognize and rejoice this and devote their lives in and for NAMASMARAN!

SHRIRAM SAMARTH!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1436 )  |  User Rating
Rate It

सहिष्णुता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
सहिष्णुता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

१. अंतर्बाह्य ईश्वर असताना त्याचा जणू पूर्ण विसर पडणे व त्याविषयी टिंगल टवाळीची भावना असणे आणि वासनाविवशतेचे अर्थात हीन स्वार्थाचे उद्दंड आणि बेभान समर्थन करणे (सहिष्णुता?)
२. वासना आणि ध्येय यांच्यात संघर्ष होऊन सारखी ओढाताण होणे अन वासनेमध्ये पुन्हा पुन्हा नाईलाजाने ओढले जाणे व वाहात जाणे व आपल्या आतल्या आणि बाह्य जगातील वासनेविषयी चीड येणे (असहिष्णुता) आणि कधी ह्या संघर्षामध्ये तीव्र खिन्नता येणे
३. ध्येयावरची पकड भक्कम होता होता वासनेची पकड ढिली होत जाणे आणि स्वत: आणि इतरांच्या वासनेविषयी असलेली चीड हळु हळु कमी होत जाणे व त्याचबरोबर ध्येयाविषयी अस्वस्थता,आतुरता व तळमळ निर्माण होणे
४. कालांतराने; ध्येयसिद्धीची खात्री झाली की अंतर्बाह्य वासनांचा भपका, बडेजाव, प्रभाव, बाऊ वा दबाव वाटेनासा होणे
५. अंतर्बाह्य पसरलेल्या वासनेचे पर्यवसान अखेर; त्याच एकमेव ध्येयात वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आणि वेगवेगळ्या काळानुसार पण निश्चीतपणे होते याची जाणीव ठळक होऊन; ध्येयाचा आग्रह/हेका/हट्ट आणि वासनेचा तिरस्कार व तिटकारा (ताप उतरल्यावर घाम निघून जावा तसे) हळु हळु निघून जाणे (सहिष्णुता!)
६. आतील आणि बाहेरील वासनांचा प्रभाव कमी झाल्यामुळे एकाच वेळी अंतर्बाह्य परिवर्तनाची विजयी अनुभूती येऊ लागणे आणि अंतर्बाह्य आघात विफल होऊ लागल्यामुळे शाश्वत समाधान आणि सार्थकता आवाक्यात येऊ लागणे
नामधारकाच्या आयुष्यातील अनुभवांचा हा सर्वसाधारण व ढोबळ मानाने आलेख आहे.
श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1557 )  |  User Rating
Rate It

कर्तव्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कर्तव्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

प्रत्येकाला पूर्णत्वाची आंस असते.

पण ती ओळखता येतेच असे नाही. तसेच शब्दात सांगता बोलता येतेच असे नाही. त्याचप्रमाणे ती आंस तृप्त करण्याचे साधन माहीत असतेच असे नाही. एवढेच नव्हे तर ते साधन कळले तरी त्या साधन मार्गावर चालता येतेच असेही नाही. आणि अखेर साधन मार्गावर चालू लागला तरी अखेरपर्यंत चिकाटीने चालत राहणे जमतेच असे नाही!

आपलेही तसेच असते!

म्हणून कधीही कुणाहीबद्दल असहिष्णू असणे योग्य नाही.

पण आपण सहिष्णू व्हायचा उपाय कोणता?

आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे.

तसे करता करता आपली इतरही कर्तव्ये आपोआपच आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने पार पाडली जातात!

श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1497 )  |  User Rating
Rate It

नाम आणि आनंद: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नाम आणि आनंद: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

गुरु म्हणजेच ईश्वर. तो अंतर्बाह्य सर्व काही व्यापून आहे. कालातीत आहे. आनंदमय आहे.
पण अहंकाराने आपण त्यापासून वेगळे होतो. वेगळेपणात अस्वस्थता, असुरक्षितता, धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती आहे.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर; अस्वस्थता, असुरक्षितता धडपड, फरपट, दुबळेपणा, दु:ख आणि भीती ही अहंकाराची लक्षणे आहेत. स्वत:चे असो वा जगाचे; दु:ख घालवण्यासाठी आपण तळमळतो आणि धडपडतो! पण ज्याप्रमाणे कितीही मीठ घातले तरी “गोडी” वाढू शकत नाही, त्याप्रमाणे नुसते तळमळून आणि धडपडून स्वत:ला किंवा जगालाआनंद मिळू शकत नाही.

पण अहंकाराने धडपडता धडपडता आणि तळमळता तळमळता गुरुकृपेने नामस्मरणाचा मार्ग मिळतो आणि गुरुकृपेने नामस्मरण वाढत वाढत जाऊन गुरुकृपेची म्हणजेच परिस्थितीनिरपेक्ष अशा नामानंदाची अधिकाधिक प्रचीती येत जाते!

श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5493 )  |  User Rating
Rate It

इलाज बेचैनीचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
इलाज बेचैनीचा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

मुले दूर परदेशी राहत असली, आई-वडील लांब मायदेशी राहत असले, तर आपल्या मनांत एक सल असतो. हुर हूर असते. अगदी जवळच्या व्यक्तीच्या आजारीपणात आपण डॉक्टरचे उपचार करतो हे खरे, पण ते देखील कसलीच खात्री देऊ शकत नाहीत, त्यामुळे आपण असहाय्यच असतो! अगदी आपल छोटं बाळ कळवळून रडू लागल, तर देखील आपण हतबल होतो. एवढच नव्हे तर, आपल्या स्वर्गवासी आईवडिलांची आठवण आली तर देखील आपण कासावीस होतो! वाटत, आपण काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी!

अश्या सर्व वेळी काय करायचं?

सद्गुरू म्हणतात, अश्या असहाय्य वेळी फक्त नामस्मरणच आपल्याला आधार, सामर्थ्य, स्थैर्य, आणि स्वास्थ्य देते. सदा सर्व काळी, सर्व परिस्थितीत फक्त नामस्मरणच आपल्याला संजीवनी देते!
कितीही कठीण वेळ आली तरी न डगमगता; नामस्मरण करावेच करावे; हेच खरे!
श्रीराम समर्थ!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 5617 )  |  User Rating
Rate It



None
To
Scrap Flag
Scrap