कुटुंबाचे स्वास्थ्य: डॉ. श्रीनिवास कशाळीक
Posted by on Monday, 23rd May 2016
कुटुंबाचे स्वास्थ्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपले आई वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; सर्व जण सुखी आणि स्वस्थ असावी असे आपल्याला वाटते ना? म्हणजेच आपल्या अवती-भोवती प्रसन्न वातावरण असावे असे वाटते ना?
पण आपली शारीरिक क्षमता, आपली आर्थिक कुवत, आपली सामाजिक प्रतिष्ठा, आपले राजकीय वजन इत्यादी कमी कमी होत चालल्या की आपण निकामी झाल्याच्या जाणीवेने आपण असहाय्य आणि खिन्न होत जातो! आपले आप्त आणि स्वकीय जर दूर राहात असले तर आपल्याला हे अधिकच जाणवते!
पण ह्या क्षणी सावरले पाहिजे! आपले आई-वडील, आपले मित्र-मैत्रिणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुले, आपली नातवंडे, आपले शिक्षक, आपले डॉक्टर, आपले विद्यार्थी; थोडक्यात सर्व जण सुखी आणि स्वस्थ व्हावे यासाठी अगदी असहाय्य अवस्थेत देखील आपल्याकडे साधन आहे!
ते साधन म्हणजे नामस्मरण! त्यानेच आपल्या हृदयातील ईश्वर प्रगट होऊन ह्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वास्थ्याचा वसंत अंतर्बाह्य फुलवतो!
Rate It
जग सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीè
Posted by on Wednesday, 18th May 2016
जग सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपल्या अंतर्मनात पुष्कळदा एक प्रकारची हुरहूर असते. आहे त्यापेक्षा काही तरी भव्य-दिव्य आणि रोमांचक असू शकेल आणि असावे असे वाटत असते.
पण आपण जर हे लक्षात घेतले की हे जे आपल्याला वाटत असते, ते ईश्वरेच्छेने (म्हणजेच गुरुच्या इच्छेने) “वाटत” असते, तर मग जगाला काय “वाटावे” हे देखील ईश्वरेच्छेनेच नाही का ठरणार?
तसेच आज आपल्याला जे जग दिसते ते क्षणभंगुर असून, आपल्या कल्पनेच्या पलिकडे, आपल्या मनाच्या वेगाहून अधिक वेगाने आणि आपल्या बुद्धीपेक्षा अधिक अचूकपणे ईश्वरेच्छेने “सुधारत” असते हे खरे नाही का?
म्हणूनच; “जग सुधारणे” म्हणजे “आपले आकलन, आपली मते, आपल्या कल्पना, आपली आवड आणि आपली बुद्धी बाजूला ठेवून ईश्वरेच्छेशी तद्रूप होणे” होय.
ईश्वरेच्छेनेच आपण नामस्मरण करीत असल्यामुळे आणि त्याचा प्रसार करीत असल्यामुळे; कुणी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे ईश्वरेच्छेनेच ठरते; आणि हे नामस्मरण करता करता समजते आणि आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होतो!
श्रीराम समर्थ!
Rate It
स्वत:ला सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कश&
Posted by on Tuesday, 17th May 2016
स्वत:ला सुधारणे म्हणजे काय? डॉ. श्रीनिवास कशाळीकर
श्रीराम समर्थ!
स्वत:ला सुधारणे म्हणजे काय?
सद्गुरु श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !”
“जग सुधारायच्या नादी लागू नका”; म्हणजे जगाबद्दल बेपर्वा, बेफिकीर राहा असे नव्हे. उलट जग सुधारणे अत्यंत महत्वाचे आहे! पण आपण जग सुधारणे म्हणजे “जे” समजतो ते नाही आणि “जसे” समजतो तसेही संत समजत नाहीत!
आपण स्वत: उथळ आणि स्थूल असल्यामुळे जग सुधारायची आपली कल्पनाही उथळ, स्थूल आणि भ्रामक असते. जग सुधारणे म्हणजे जगाने आपले म्हणणे मान्य करणे नव्हे! जग सुधारणे म्हणजे जग आत्मज्ञानी होणे!
“स्वतःला सुधारा” याचा अर्थ काय?
स्वत:ला सुधारणे म्हणजे नेमके काय? ते कसे शक्य होईल? सुधारणे म्हणजे दोष काढणे म्हणावे तर आपल्यातले हजारो दोष आपल्याला दिसत देखील नाहीत आणि दिसले तर त्यांचे मूळ उपटून काढू म्हणता काढता येत नाही!
स्वत:ला सुधारणे म्हणजे अंतर्मुख होणे आणि आत्मज्ञानी होणे! आत्मज्ञानाचा मार्ग नामस्मरण!
“की त्या मानाने जग सुधारेलच” याचा अर्थ काय?
आपण आणि जग तत्वत: भिन्न नसल्यामुळे जगाला सुधारणे आणि स्वत:ला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत! जग खऱ्या अर्थाने सुधारायचा मार्ग स्वत:च्या अंतरंगातून होणाऱ्या अखंड नामस्मरणातूनच जातो!
“आपण सुधारलो नाही, तर मग जग सुधारले नाहीच!” म्हणजे काय?
आपण आत्मज्ञानी नसताना भ्रमात असतो. त्यामुळे आपल्याला जग बिघडले (आपले न ऐकल्यामुळे) किंवा सुधारले (आपले ऐकल्यामुळे) असे वाटले तरी तो भ्रमच असतो! त्यामुळे जग बिघडले किंवा सुधारले असे म्हणणे पूर्णत: भ्रामक असते! म्हणूनच आपण सुधारलो नाही तर जग सुधारले नाहीच!
तात्पर्य:
स्वत:ला सुधारणे म्हणजे जमेल तसे आणि जमेल तितके नामस्मरण करीत राहणे!
Rate It
षड्रिपु आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीक
Posted by on Wednesday, 11th May 2016
षड्रिपु आणि नामस्मरण: डॉ.श्रीनिवास कशाळीकर
षड्रिपु म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर.
शरीरक्रियाशास्त्रीय दृष्ट्या पाहिल्यास षड्रिपु नसणे शक्य नाही. म्हणून षड्रिपु त्याज्य आहेत असे म्हणून आपण त्यांच्या पासून मुक्त होऊ शकत नाही. पण हे देखील खरे की आयुष्यभर त्यांच्या मागे लागून आपण तृप्त मात्र होत नाही! समाधानी होत नाही!
असे का होते?
कारण षड्रिपुंची पूर्ती स्थूल आणि मंद असते! स्वतंत्रपणे ती अंतर्मनापर्यंत आणि अंतरात्म्यापर्यंत पोचत नाही! धग मंद असेल तर ज्याप्रमाणे स्वयंपाक शिजत नाही, तसेच हे आहे!
जीवनातील सर्व सुख दु:ख्खाना नामस्मरणाचा अग्नी मिळाला तरच अनंतरात्म्याची तृप्ती होऊ लागते! आणि समाधान होऊ लागते! म्हणूनच समाधान मिळवायचे असेल तर जीवनामध्ये नामस्मरणाची तीव्र गरज आहे! अर्थात ह्याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकेल. केवळ विचाराने, वाचनाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने नाही!
Rate It
श्रीराम समर्थ! डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 10th May 2016
श्रीराम समर्थ! डॉ. श्रीनिवास कशाळीकर
केवळ प्रारब्धजन्य- देहाबुद्धीजन्य - भ्रमजन्य भोगामुळेच मी नामेतर बाबींमध्ये गुरफटत व खितपत असतो.
वास्तविक मला; तीव्र कामना नामाचीच असते, चित्ताचा क्षोभ नामवियोगानेच होतो, हवेपणा नामात न रंगल्यामुळेच असतो, असुरक्षितता आणि चिंता नामाचे "घर" नसल्यामुळेच वाटत असते आणि नामाच्या परम वैभवाच्या अज्ञानामुळेच क्षणिक व क्षुद्र हानि-लाभामध्ये मद व मस्ती;वाटत असते!
गुरुकृपेनेच नाम घेत राहता येते आणि समाधान वाढत जाते!
श्रीराम समर्थ!
Rate It