नाम: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Thursday, 26th November 2015
नाम: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपण नामस्मरण करू लागलो की एरवी अलभ्य असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपले जीवन चैतन्यमय, बनू लागते.
अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या झाल्या नाही तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा” मिळाल्यामुळे “नेहमी कृतज्ञ राहावे” ही साधू संतांची शिकवण आपल्यासाठी सुसाध्य बनते!
नामामृताची महती अशी की; आपल्याला स्पष्टपणे जाणवते की नाम हेच आपले गंतव्य आहे आणि नाम हेच आपले प्राप्तव्य आहे!
नाम हेच आपले सर्वस्व आहे!
Rate It
विश्वास: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Thursday, 26th November 2015
विश्वास: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपण सारे; पुन्हा पुन्हा चैतन्याच्या विस्मृतीत जातो आणि इंद्रियगम्य भूलभूलैय्यात अडकत राहतो, हरवत राहतो आणि चैतन्याला पारखे होतो.
दृश्य विश्वाच्या आकर्षणाचा जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या विरुद्ध दिशेला वळते! साहजिकच आपण भलतीकडेच भरकटत जातो! परिणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणि पूर्णत्व, सार्थकता आणि समाधान आपल्यापासून दूरच राहतात!
पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वास अविश्वासाच्या पलीकडे; विश्वचैतन्याची जननी आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आणि करीत राहणांर आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन करवीत आहे आणि करविणार आहे. सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन भरून टाकीत आहे आणि टाकणार आहे.
ह्यावर "अंधच" नव्हे; तर "डोळस" विश्वास देखील ठेवला नाही तरीही त्याचा अनुभव येतो आहे आणि येत राहणार आहे.
Rate It
आनंदाचे वारस: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीक
Posted by on Tuesday, 24th November 2015
आनंदाचे वारस: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे.
जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत आणि समाधान सापडणे कठीण आहे.
ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व दुरवस्थेवरील इलाज आहे.
ह्या सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे. प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारा स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्याचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!
Rate It
नाम आणि आरोग्यसेवा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 24th November 2015
नाम आणि आरोग्यसेवा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
ज्या ज्या गोष्टी आपण नामविस्मरणात करतो, त्या त्या आपल्याला आपल्या अंतरात्म्यापासून म्हणजेच सत्यापासून परावृत्त करतात आणि दूर लोटतात!
आरोग्याच्या बाबतीत देखील हे खरे आहे. ज्या आरोग्यकेंद्रांमध्ये, दवाखान्यांमध्ये, इस्पितळामध्ये नामस्मरण असते ती अमृतत्वाची तीर्थे बनतात आणि नामस्मरणाच्या अभावी दु:साध्य अस्वस्थतेची डबकी बनतात.
Rate It
नामहृदय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Tuesday, 24th November 2015
नामहृदय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
साप आणि मुंगुस प्रेमाने राहू शकतात. पण अहंकाराने बरबटलेले पतीपत्नी मात्र भांडतात आणि भांडत राहतात.
पण गुरुकृपेने लाभलेल्या नामाने पती आणि पत्नी हळू हळू अहंकारावर मात करून एकमेकांशी एकरूप होतात.
प्रत्येक पतीपत्नीमध्ये दैवी प्रणयाचा अंश असतोच. नामाने तोच दैवी आणि उदात्त अंश फुलतो आणि पूर्णत्वाकडे जातो!!
Rate It