World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000071
PAGE HITS0080499

नामस्मरण हा सरळ रस्ता: डॉ. श्रीनिवास जनार्द&#
नामस्मरण हा सरळ रस्ता: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू विलक्षण साधना करीत असताना दिसतात. सत्य जाणून घेण्यासाठी अशा कठीण साधनांची आवश्यकता आहे का?

शिक्षक: त्यांच्यासाठी ती आवश्यक आहे की नाही हे आपण कोण ठरविणार? प्रत्येक व्यक्ती आणि तिचे संचित आणि प्रकृती भिन्न असते. जडण घडण वेगवेगळी असते. संस्कार वेगळे असतात. आर्थिक, धार्मिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी प्रकारची पार्श्वभूमी वेगवेगळी असते.
मुलाला कशाची गरज आहे हे आईला ज्याप्रमाणे कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमची (आमच्यातल्या चैतन्याची) जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहानही कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्वही समजत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन आमची माउली आमची तहान भागवतेच! मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते, हे जसे खरे, तसेच आपल्याला चैतन्यपान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील, जरी मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण कधी “कुलदेवता”, कधी “इष्टदेवता” तर कधी “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! याकारणास्तव आपल्या परंपरेनुसार आलेली साधना आणि उपासना आपल्यासाठी सुलभ आणि परिणामकारक असते. इतरांच्या उपासनेशी आपल्या उपासनेची तुलना करणे योग्य ठरत नाही आणि उपयुक्तही ठरत नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे मला नीट समजू लागले. विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली. बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1939 )  |  User Rating
Rate It

तणावमुक्तीचा अस्सल अनुभव: डॉ. श्रीनिवास जन
तणावमुक्तीचा अस्सल अनुभव: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळा पवित्र होईल आणि निरुपद्रवी होईल आणि चैतन्यप्रभात होईल ही भाकिते भ्रामक वाटतात. कारण जगामध्ये मन प्रसन्न करणाऱ्या घटनांबरोबरच मन खिन्न करणाऱ्या असंख्य घटना देखील हरघडी आढळतात.

शिक्षक: खरे आहे. म्हणूनच; आपली फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अंतर्यामी डोकावले पाहिजे. तसे केले असता चैतन्यप्रभातीच्या ह्या दृश्य आणि ढोबळ लक्षणांव्यतिरिक्त; आपल्याला; आपल्या स्वत:च्या अंतर्यामी; नामरुपी चैतन्यसूर्य उगवून तळपताना दिसतो! सूर्य ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असतो, कुठल्यातरी कोपऱ्यात नाही, त्याप्रमाणे नामसूर्य आपल्या अखिल जीवनाच्या केंद्रस्थानी असून आपले अंतर्बाह्य सर्व जीवन संचालित आणि प्रकाशित करतो आहे हे स्पष्ट दिसते. ह्या नामसूर्याच्या दर्शनातून चैतन्यप्रभातीची खरीखुरी आणि अस्सल प्रचीती येते.

कला, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शेती इत्यादी; जीवनाची सर्व ज्ञानक्षेत्रे अंतर्यामीच्या चैतन्यातून उगम आणि स्फुरण पावून चैतन्याद्वारेच नियंत्रित होत आहेत आणि विश्वहितकारी होत आहेत ह्याची हरघडी प्रचीती राहते.

जगभरातल्या महानुभावांना अभिप्रेत असलेला आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानी अधिकारवाणीने पुरस्कृत केलेला विश्वकल्याणकारी स्वधर्म; प्रगट होण्यासाठी आज प्रत्येकाच्या हृदयात उसळी घेत आहे! वेगळ्या शब्दात सांगायचं तर; वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, दवाखाने, दुकाने, प्रयोगशाळा, बालवाड्या, आश्रमशाळा, विद्यालये, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच ठिकाणी सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार, सदभिरुची, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सत्कर्म आणि सदाचार हे सर्व; वैयक्तिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर व्यक्त होण्यासाठी सर्वांतर्यामातून उसळी घेत आहेत!

माझा एक मित्र सतत नामस्मरण करीत असतो. ह्या माझ्या मित्राचा अनुभव असा की तो एकदा घरासमोरच्या उद्यानात फिरत असताना त्याला स्पष्टपणे जाणवले की त्या बागेतल्या प्रत्येक झाडात आणि पानाफुलात नामस्मरण चालू आहे! हा अनुभव काही त्याचा एकट्याचाच नाही! मनाची किंवा जाणीवेची सूक्ष्मता आणि संवेदनाक्षमता आल्यानंतर अनेकांना हा अनुभव आल्याचे दाखले आहेत. या अनुभवाचा मथितार्थ असा की आपल्या वैयक्तिक इच्छे-अनिच्छेपलिकडे चैतन्ययोगाची ही साधना आणि आविष्कार सर्वान्तर्यामी चालू आहे! नाम हे चैतन्यदायी अमृत आहे, किंवा चैतन्यामृत आहे. आपले अंतर्बाह्य व्यापणाऱ्या चैतन्यामृतामुळे आपला स्वत:चा स्वत:शी असलेला आणि स्वत:चा इतरांबरोबर चालणारा संघर्ष संपुष्टात येत जातो. आपल्या आणि इतरांमधल्या आंतरिक एकात्मतेची गोडी अनुभवाला येते.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1856 )  |  User Rating
Rate It

तणावाचे बळी की आनंदाचे वारस?: डॉ. श्रीनिवास ज
तणावाचे बळी की आनंदाचे वारस?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये जमीन, पाणी, वीज, शौचकूप, स्नानगृहे इत्यादी अनेक सोयी सरकारी पैशातून म्हणजेच कर भरणाऱ्या जनतेच्या पैशातून पुरविल्या जातात. हीच बाब इतर यात्रांच्या आणि सार्वजनिक उत्सवांच्या बाबतीत देखील खरी आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी हे सर्व लागते का?

शिक्षक:. तमोगुण आणि रजोगुण वाढल्यामुळे वेड, वासना, आवडी, छंद, लहरी, फॅशन्स, व्यसने, विकृती; अशा बाबींसाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. संकुचित स्वार्थापायी फसवणे आणि फसले जाणे; हे सार्वत्रिक झाले आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब कुंभ मेळ्यात देखील पडते आहे.

जोपर्यंत नामस्मरण सर्वत्र पसरत नाही आणि झिरपत नाही, तोपर्यंत कुंभ मेळ्यामध्ये देखील आत्मसाक्षात्कारी निस्पृह संत महंत फार मोठ्ठ्या प्रमाणात सापडणे कठीण आहे. किंबहुना तोपर्यंत; कुंभ मेळ्यामध्ये देखील थकले-भागलेले, चुकले-माकलेले, गोर-गरीब, रंजले-गांजलेले, पोटासाठी वणवण करणारे लोकच जास्त आढळणे साहजिकच आहे.

ज्या अजरामर आंतरिक चैतन्याची हाक (Inner Voice) आपल्याला ऐकू येत नाही आणि ज्याच्यापासून तुटल्यामुळे आपण अचेतन आणि मरतुकडे बनलो आहोत, त्या अनादी, अनंत, सर्वव्यापी तसेच सर्वांच्या अंतर्यामी आणि बाहेर असलेल्या सच्चिदानंद “वस्तु”ला ओळखणे, समजणे, आठवणे आणि हळु हळु त्या “वस्तु”शी तद्रुप होणे; हा सर्व कुंभ मेळ्यातील आणि त्याच्या बाहेरील सर्वच दुरवस्थेवरील इलाज आहे. ह्या अनादी अनंत सच्चिदानंद वस्तूला ओळखण्याचे, समजण्याचे, आठवण्याचे आणि हळू हळू त्या वस्तुरूप होण्याचे अनादी साधन; ह्या वस्तूच्या नावाचे म्हणजेच नामाचे स्मरण म्हणजे नामस्मरण आहे.

विद्यार्थी: तुमच्या मते; नामस्मरणाच्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील इतर विकृती ज्या प्रमाणात कमी होत जातील; त्या प्रमाणात कुंभ मेळ्यांचे स्वरूप देखील अधिक पवित्र आणि निरुपद्रवी होईल यात शंका नाही?

शिक्षक: होय. मला निश्चितपणे तसे वाटते.

विद्यार्थी: हे तुमचे भाकीत आहे?

शिक्षक: ही आपल्या सर्वांच्या अंतर्यामी राहून सदैव आपली काळजी घेणाऱ्या नामरूप चैतन्याची म्हणजेच आपल्या सर्वांच्या गुरूदेवांची कृपा आहे! प्रत्येकाच्या गुरुचे व्यावहारिक नाव गाव वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात जो नामरूप गुरु असतोच, त्याच्याच कृपेने आपल्या सर्वांना; नामस्मरणाच्या द्वारे होणारी चैतन्यप्रभात आणि स्वधर्म सूर्याचा उदय आणि त्यांचा कल्याणकारी प्रभाव यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1791 )  |  User Rating
Rate It

नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत आहे? : डॉ. श्री&
नामस्मरणाबद्दल जिज्ञासा वाढत आहे? : डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर

विद्यार्थी: कुंभ मेळ्याविषयी जगभर कुतुहूल वाढते आहे हे मला माहीत होते. पण नामस्मरणाबद्दल देखील कुतुहूल आणि जिज्ञासा वाढत आहे?

शिक्षक: होय! नक्कीच! जगभर नामस्मरण पहायला मिळते. कुणी जपमाळ घेऊन तर कुणी माळेशिवाय नामस्मरण करतो आहे. कुणी एका जागी बसून तर कुणी फिरत फिरत नामस्मरण करतो आहे. कुणी मोठ्ठ्याने उच्चार करून तर कुणी मनातल्या मनात, कुणी डोळे मिटून तर कुणी डोळे उघडे ठेवून, कुणी श्वासोच्छवासावर तर कुणी उत्स्फूर्त भावनेने आणि आर्ततेने नामस्मरण करतो आहे. कुणी घरी तर कुणी ऑफिसमध्ये, कुणी देवळात तर कुणी शाळेत, कुणी फॅक्टरीत तर कुणी रुग्णालयात; आणि कुणी दुकानात तर कुणी शेतात नामस्मरण करीत आहे!
प्रत्येक स्तरातला आणि वयातला, आणि प्रत्येक धंद्यातला आणि नोकरीतला माणूस; या ना त्या कारणास्तव नामस्मरणाकडे वळत आहे आणि त्यात मुरत आहे!
रेड़िओ-दूरदर्शनवर नामस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागले आहेत. नामस्मरणाची महती गाणारी गीते, पदे, कविता, भजने वारंवार वेगवेगळ्या उत्सवांतून आणि समारंभांतून ऐकू येऊ लागली आहेत. देशविदेशांतून कीर्तनकार, रामकथाकार, भागवत कथाकार यांना मागणी वाढत आहे. वेगवेगळ्या दूरदर्शन मालिकांमधून नामस्मरणाचे गोडवे गायिले जात आहेत.
विशेष म्हणजे निर्हेतुक वृत्तीने आणि निष्काम भावनेने नामस्मरण केले असता; सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण कसे साध्य होते याचे विवरण करणारी पुस्तके, सीडीज, व्हिडीओ सीडीज मोफत वितरण केली जाऊ लागली आहेत आणि इंटरनेटवर मोफत डाऊन लोड साठी उपलब्ध केली जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे एरवी दुर्लक्षित राहणारी अशी ही पुस्तके लोक मोठ्ठ्या उत्सुकतेने आणि आस्थेने वाचत आहेत आणि सीडीज व व्हिडीओ सीडीज ऐकत आणि बघत आहेत!
नामस्मरण ही उतार वयात गलितगात्र झाल्यानंतर करण्याची किंवा रिकाम्या वेळात करण्याची, निरुपयोगी, निरुपद्रवी, दुर्लक्षित आणि कोपऱ्याताली बाब राहिलेली नाही. नाम आणि नामस्मरण ही जीवनाच्या नियंत्रक केंद्रस्थानी असल्याची जाणीव प्रकर्षाने होताना दिसत आहे. साहजिकच नामस्मरणाला सर्वाधिक महत्व आणि सर्वोच्च प्राधान्य आले आहे. जगभर नामस्मरणाचा अंत:करणपूर्वक स्वीकार, प्रसार आणि जयजयकार होत असून आपल्या सर्वांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनाची गाडी हजारो वर्षांच्या आणि हजारो लोकांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईने आज खऱ्या अर्थाने रुळावर येत आहे! ह्या सर्वंकष कल्याणालाच आपण चैतन्ययोग म्हणतो.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1565 )  |  User Rating
Rate It

NAMASMARAN IS THE WAY: DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR
NAMASMARAN IS THE WAY: DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR

• NAMASMARAN is the way to know that NAMA is beyond time (past, present and future)!
नाम हे कालातीत (वर्तमान, भूत आणि भविष्य यांच्या अतीत) आहे; हे नामस्मरणाने कळू लागते!

• NAMASMARAN is the means to restore the inherent and eternal innate support of NAMA (true self)!
स्वत:चा अजरामर मूलाधार पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणजे नामस्मरण!

• NAMASMARAN is the process of consolidating link between us and Guru!
स्वत:च्या गुरूबरोबरचे नाते भक्कम करणारी प्रक्रिया म्हणजे नामस्मरण!

NAMASMARAN is the process of invoking the Guru from deep within!
नामस्मरण ही आपल्या अंत:करणातून गुरुतत्व प्रगट होण्याची प्रक्रिया आहे.

• NAMASMARAN is the essential characteristic of a truly advancing civilization.
खऱ्या समाजसुधारणेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे नामस्मरण!

• NAMASMARAN with its increasing intensity and spread is the signal of an incoming holistic renaissance!
अधिकाधिक प्रमाणावर आणि अधिकाधिक उत्कटतेणे नामस्मरण होणे हे संपूर्ण क्रांतीचे निदर्शक आहे.

• NAMASMARAN is God’s ultimate personal grace; and its globalization is God’s ultimate global grace!
आपल्याकडून नामस्मरण होणे ही आपल्यावरील आणि जगाकडून नामस्मरण होणे ही जगावरील ईश्वरकृपा आहे!

• NAMASMARAN is the process of freedom from illusion and realization of reality!
• नामस्मरण ही भ्रमातून मुक्त होत; होत सत्य अनुभवण्याची प्रक्रिया होय!

• NAMASMARAN is shifting our reliance from deceptive to ever dependable!
नामस्मरण म्हणजे फसव्या बाबींवरील भरंवसा काढून; तो; भरंवश्याच्या बाबींवर ठेवण!

• NAMASMARAN is going from falsity, darkness and death to truth, light and immortality!
नामस्मरण म्हणजे; असत्य, अंधार आणि मृत्यू कडून सत्य, प्रकाश आणि अमृतत्वाकडे जाणे!

• NAMASMARAN is the only way to complete; the otherwise incomplete life.
एरवी अपूर्ण आणि अस्वस्थ असलेले जीवन; पूर्ण आणि स्वस्थ करण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण.

• NAMASMARAN is the way of experiencing ecstasy even amidst agony.
नामस्मरण म्हणजे वेदनेमध्ये देखील उल्हसित राहण्याचा मार्ग होय!

• NAMASMARAN is the way to fulfillment in otherwise unfulfilled life.
अन्यथा अतृप्त आणि असमाधानी असे जीवन; तृप्त आणि समाधानी करण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण!

• NAMASMARAN is the way to know that NAMA is always victorious i.e. “NAMA EVA JAYATE”!
नाम हेच सर्वथा विजयी असते अर्थात “नाम एव जयते” हे जाणण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 1659 )  |  User Rating
Rate It



None
To
Scrap Flag
Scrap