OUR NEED: DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR
Posted by on Friday, 11th September 2015
OUR NEED: DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR
• Practicing NAMASMARAN and promoting it; through our aptitudes, in born skills and professional expertise; is our innate need.
अधिकाधिक नामस्मरण करणे आणि त्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार व कौशल्यानुसार प्रसार करणे ही आपल्या अंतरात्म्याची निकड आहे.
• NAMASMARAN is the way to listen, recognize and follow the inner voice called SWADHARMA.
आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणे, ओळखणे व त्यानुसार वागणे; म्हणजेच स्वधर्माचे पालन करणे; नामस्मरणाने जमू लागते..
• NAMASMARAN is the panacea to go beyond diseases and debility!
नामस्मरण ही व्याधी आणि विवशता दूर करणारी संजीवनी आहे.
• NAMASMARAN is the straight expressway to merge with NAMA (true self) and be totally and permanently free!
नामस्मरण हा नामाशी तद्रूप होण्याचा म्हणजेच पूर्णत: आणि कायमचे स्वतंत्र होण्याचा सरळ महामार्ग आहे.
Rate It
NAMA MAHATMYA: THE GRANDEUR OF NAMA DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR
Posted by on Friday, 11th September 2015
NAMA MAHATMYA: THE GRANDEUR OF NAMA: DR. SHRINIWAS JANARDAN KASHALIKAR
• NAMASMARAN is the way to know that NAMA is the only truth amidst all other fleeting experiences!
इतर सर्व नश्वर आणि क्षणभंगुर अनुभवांमध्ये; नाम हेच अंतीम सत्य आहे हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण.
• NAMASMARAN is the way to know that NAMA is the ultimate controlling central source of all power!
नाम हे सर्व विश्वाच्या संचालक शक्तीचे मूळ केंद्र आहे; हे नामस्मरणाने अनुभवाला येते.
• NAMASMARAN is the way to know that NAMA is the true self, God, Guru, Brahma and ultimate truth!
नाम हेच स्वत:चा खरा स्व, ईश्वर, गुरु, ब्रह्म वा अन्तीम सत्य आहे हे जाणण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण.
• NAMASMARAN is like eating pulp of mango and rest all occupation is like eating its skin!
नामस्मरण म्हणजे आंब्याचा रस ग्रहण करण्यासारखे आणि त्याविरोधी इतर सर्व काही म्हणजे; साली खात बसण्यासारखे आहे.
• NAMASMARAN is the way to realize the true self, experience immortality.
नामस्मरण हा अमृतत्वाचा अनुभव घेण्याचा म्हणजेच आत्मानुभवाचा मार्ग आहे.
Rate It
नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे: डॉ. श्रीनिवास ज&
Posted by on Saturday, 22nd August 2015
नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: कुंभ मेळ्यामध्ये पुष्कळ गांजा ओढला जातो, त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
शिक्षक: गांजा असो वा अन्य मादक पदार्थ; त्यांच्याबद्दल; आपल्या मनात एक प्रकारची दहशत असते. तसेच; तिटकाराही असतो. पण साधूंच्या बद्दल; आदरयुक्त दबदबा आणि एक प्रकारचे कुतुहूलमिश्रित गूढ आपल्या मनात असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दल फटकळपणे बोलत नाही आणि त्यांच्याविरोधी टोकाची भूमिका घेत नाही.
पण सर्वच मादक पदार्थ सारखेच नसतात. काही मादक पदार्थ मन भडकवू शकतात आणि त्यामुळे हिंसक गुन्हे घडू शकतात. पण काही मादक पदार्थ मनाची खळबळ, अशांती, अस्वस्थता, उन्माद वगैरे कमी करतात. असे म्हणतात की; काही मादक पदार्थामुळे लैंगिक वासना दबली जाते व वीर्यस्खलन वा शीघ्रपतन होत नाही. अध्यात्मिक प्रगतीसाठी वीर्यस्खलन होऊ न देणे महत्वाचे आहे असे काहीजण मानत असल्यामुळे लैंगिक वासना दाबून अध्यात्मिक प्रगती साधता यावी म्हणून ते मादक पदार्थांचे सेवन करत असू शकतात! त्यामुळे; गांजा ओढणे हे सर्व सामान्यांच्या कसोटीला उतरत नसले तरी तो गंभीर गुन्हा मानला जात नसावा.
विद्यार्थी: पण हे योग्य आहे?
शिक्षक: आपण व्यक्तिगत जीवनात कसे वागावे, काय खावे-प्यावे; आपला दिनक्रम कसा असावा; ह्याबद्दल जबरदस्ती वा सक्ती असावी का? कुणी ब्रह्मचारी असावे की गृहस्थाश्रमी ह्याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याला हवे की नको? कुणी कोणते कपडे घालावे हे कुणी ठरवायचे?
त्यामुळे मला वाटते; इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; आपले आचरण तपासून पाहावे. काळजीपूर्वक तपासल्यानंतर; आपले आचरण आपल्या स्वत:ला थोडे जरी खुपत किंवा सलत असले; किंवा लोकांना हानिकारक होत असले, तर ते प्रयत्नपूर्वक सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी नामस्मरण हाच उत्तम उपाय आहे असेच सर्व संतांचे सांगणे आहे.
विद्यार्थी: इतरांना नावे ठेवण्यापेक्षा; स्वत:कडे त्रयस्थ दृष्टीने पाहणे फार महत्वाचे आहे, कठीण आहे! तसेच; स्वत:मधले दोष दूर व्हावे असे वाटणे आहे, देखील कठीण आहे! नामस्मरणाने जर हे शक्य होत असेल असेल तर मी जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करीन.
शिक्षक: हा संकल्प सर्वश्रेष्ठ पण तो तेवढाच कठीण देखील आहे. कारण; आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे अनुभवतो, ते सारे आपल्या संकुचित आणि सदोष नजरेतून पाहत असल्यामुळे; आपल्याला नेहमीच नामस्मरणापासून विचलित करू शकते! म्हणजे; नामस्मरणाच्या आड आपले आपणच येत असतो! पण तरीही नाम, गुरु, ईश्वर म्हणजेच आपला अंतरात्मा; आपल्याकडून नामस्मरण करून घेतो!
Rate It
जीवनातील चैतन्य आणि गोडवा: डॉ. श्रीनिवास जन
Posted by on Saturday, 22nd August 2015
जीवनातील चैतन्य आणि गोडवा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: सध्या आपण पाहतो, की कुंभ मेळ्यामध्ये तेथील लाखो लोकांचे आयुष्य; जंतुसंसर्ग, तज्जन्य साथी, अपघात, दहशतवादी हल्ले, गुन्हे, विकृती, दंगली; इत्यादींच्या सावटाखाली असते! त्यामुळे व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना घरच्या घरी; आणि सहज शक्य होईल असा नामस्मरणाचा मार्ग मला महत्वाचा वाटू लागला आहे. त्याबद्दल आणखी थोडे सांगा ना!
शिक्षक: कुंभ मेळ्याप्रमाणेच इतरही यात्रांमध्येही; उदाहरणार्थ; केदारनाथ, बद्रीनाथ, मानसरोवर,वैष्णोदेवी इत्यादींमध्येही; उपरोक्त धोके आणि अडचणी असतातच. पण त्या धोक्यांना न जुमानता, ह्या यात्रांना लोक जातातच. याशिवाय; गावोगावी असलेल्या ग्रामदैवतांच्या जत्रांना देखील लाखोंच्या संख्येने लोक जातातच! आपल्या पूर्वजांनी “एकत्र जमणे” ह्या मूलभूत प्रवृत्तीला विधायक चिंतनाकडे, आत्मज्ञानाकडे म्हणजेच अंतीम सत्याच्या व अमरत्वाच्या अनुभवाकडे वळवले आहे. किंबहुना वेगवेगळ्या धर्मांचे तत्वचिंतन, नीतिशास्त्र, रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींचा मूळ उद्देश; सत्याचा व अमरत्वाचा अनुभव हाच आहे.
परंतु आपल्यामध्ये; जडत्वाकडे झुकण्याची; बळकट अशी सहजप्रवृत्ती आहे. त्या सहजप्रवृत्तीनुसार; कालांतराने धर्माच्या बाह्यस्वरूपाला आणि कर्मकांडाला जास्त महत्व आले. बाह्यअवडंबर फोफावले आणि धर्माचा मूळ उद्देश बाजूला पडू लागला. मनुष्य जीवनातील चैतन्य आणि गोडवा; आणि जिव्हाळा व सहकार्य ऱ्हास पावू लागले. जीवनाचा आधार ढासळू लागला. बेदिली, संशय, अविश्वास, कटुता, संकुचितपणा वाढू लागले. संकुचितपणा आणि अचेतनपणामुळे वैयक्तिक आणि सामाजिक दुरवस्था येत गेली आणि दुरवस्थेच्या कोलाहलामध्ये आपल्याला अंतरीच्या सच्चिदानंदमय चैतन्याची साद ऐकू येणे कमी झाले. त्यामुळे आपण नामस्मरणाच्या चैतन्यसाधनेपासून बराच काळ आणि पुष्कळ प्रमाणात वंचित राहिलो आणि त्यामुळे अधिकाधिक संकुचित आणि अचेतन बनत गेलो.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, नामदेव, तुलसीदास, मीराबाई, कबीर, एकनाथ, तुकाराम, रामदास, गोंदवलेकर महाराज अशा अनेक महान संतांना ही बाब प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच सर्व संतांनी; व्यक्ती आणि समष्टी मधील आंतरिक चैतन्याचा अनुभव घेण्याचे आणि सर्वांना सहज शक्य असे नामस्मरण हे साधन प्रसृत केले. सर्वांना; अगदी व्याधीग्रस्त, अपंग, परावलंबी आणि गोरगरीबांना देखील घरच्या घरी; जमेल असे नामस्मरण त्यांनी लोकांमध्ये प्रचलित केले, लोकप्रिय केले आणि रुजवले.
पण; अखंड नामस्मरण करणे ही सोपी गोष्ट नाही, आणि अशी गोडी निर्माण होण्यासाठी रोजचे विधी, सण, उत्सव, व्रते इत्यादी सर्व बाबींना महत्व आहे, हे माहीत असल्यामुळे आणि त्यांनी या बाबींचा तिरस्कार वा द्वेष केला नाही.
Rate It
रोजच्या जीवनात उपयोग काय?: डॉ. श्रीनिवास जना&
Posted by on Saturday, 22nd August 2015
रोजच्या जीवनात उपयोग काय?: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
विद्यार्थी: सर, कुंभ मेळ्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. ह्याचा सामान्य माणसांना रोजच्या जीवनात उपयोग काय?
शिक्षक: प्रत्येक बाब; व्यावहारिक उपयोगाच्या तराजूमध्ये तोलून चालत नाही. व्यावहारिक फायदा बघूच नये असे नव्हे. पण; केवळ व्यावहारिक फायदा बघत बघत; आपले आयुष्य संपले तरी आपल्याला कृतार्थता येते का? जीवन सार्थकी लागले असे वाटते का? मनाचे अगदी समाधान झाले आणि जीवनाला पूर्णत्व आले असे होते का? नाही ना? समाजाचेही तसेच आहे. व्यावहारिक फायदा मिळवत मिळवत केवळ भौतिक दृष्ट्या संपन्न झालेले समुदाय; वैयक्तिक आणि सामाजिक प्रगल्भतेच्या अभावी अवनतीकारक दृष्टीकोन, धोरणे, कायदे, परंपरा आणि रुढींच्यामुळे आत्यंतिक संकुचितपणा, स्वार्थ, हांव, बेशिस्त, निराशा, व्यसनाधीनता, निर्दयीपणा, हिंसा; यांमुळे स्वत:च्या आणि इतरांच्या नाशाला आमंत्रण देतात.
अन्न पाणी निवारा इत्यादी बाबी जगण्यासाठी आवश्यक असतात हे खरे, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच समाजातील उत्साह, उमेद, सहिष्णुता, स्नेह, सहकार्य आणि सद्भावना वाढण्यासाठी म्हणजेच पर्यायाने; आपल्या प्रत्येकाच्या जगण्यासाठी; सत्याची, अंतीम समाधानाची म्हणजेच जीवनाच्या सार्थकतेची कास धरणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. कुंभ मेळ्यामधून अशी कास धरण्याची प्रेरणा मिळते; म्हणून त्यावर खर्च करणे अनाठायी ठरत नाही.
त्यामुळेच सरकारने ज्याप्रमाणे सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे, त्याचप्रमाणे अनीष्ट बाबी कांटेकोरपणे दूर करण्याचा प्रयत्न करत करत; कुंभ मेळ्यासारख्या प्रेरक प्रथा देखील जोपासल्या पाहिजेत.
हा समतोल आहे. वैयक्तिक जीवनात आणि सामाजीक जीवनात त्याला अत्यंत महत्व आहे. आपण सर्वांनी आणि सरकारने असा समतोल साधायचा प्रयत्न केला तर ते सर्वांच्या हिताचे ठरेल.
नि:पक्षपातीपणे पाहिले, तर सहज कळेल की; भारताकडे असा समतोल साधण्याची पूर्वपुण्याई नामस्मरणाच्या परंपरेच्या स्वरूपात उपलब्ध आहे! त्यामुळेच कुंभ मेळ्यामध्ये सेवा करण्यासाठी हजारो स्वयंसेवक आणि दान देण्यासाठी हजारो दाते पुढे येतात!
पण एकंदरीत पाहता, सरकारने देखील नामस्मरणाचे महत्व ओळखून त्याचा अंगीकार आणि प्रसार केला, तर त्यातून; सर्वांच्याच उन्नतीला आवश्यक असा समतोल साधण्यासाठी; अनेक नवनवीन धोरणे, कल्पना आणि योजना सुचतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्तीही प्राप्त होईल; हे सत्ताधाऱ्यांच्या, शासनकर्त्यांच्या आणि सर्व क्षेत्रांतील नेत्यांच्या व उच्चपदस्थांच्या लक्षात येत आहे!
Rate It