योग्य वेळ: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
Posted by on Wednesday, 27th May 2015
योग्य वेळ: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
कोणतीही बाब घडण्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते. व्यक्ती, संस्था, समाज, देश किंवा संपूर्ण विश्व; सर्वांच्या बाबतीत हे खर आहे! विशिष्ट व्यक्तीच्या, संस्थेच्या, समाजाच्या, देशाच्या किंवा अखिल विश्वाच्या सर्वंकष कल्याणाची वेळ आली की अनादी कालापासून अंतर्बाह्य बरसणारी चैतन्यवर्षा जड, स्थूल आणि दृश्य जगाच्या आरपार; दिसू लागते आणि आवाक्यात येते! अशी योग्य वेळ आज आली आहे! साऱ्या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून उरलेली चैतन्यवर्षा दिसू लागली आहे आणि सर्वांच्या आवाक्यात आली आहे!
केवळ भारताच्या नव्हे तर एकीकडे जगाच्या कोनाकोपऱ्यात; चैतन्यवर्षा होत आहे आणि त्याचवेळी ते चैतन्य आकंठ पिण्यासाठी जगभरातले तहानलेले लोक हिरीरीने पुढे सरसावताना दिसत आहेत! असा समसमायोग येणे म्हणजे अभूतपूर्व सुवर्णकालाची नांदीच होय!
कुणी नामस्मरण म्हणतो तर कुणी जिक्र, कुणी जप म्हणतो तर कुणी जाप, कुणी सिमरन म्हणतो तर कुणी सुमिरन; प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरंगातील चैतन्यपान करण्यासाठी आणि नामचैतन्यमय होउन परस्परातले एकत्व अनुभवण्यासाठी आसुसलेला दिसत आहे!
नामस्मरणाचा प्रसार आणि प्रचार विविध मार्गांनी आणि विविध माध्यमांतून करणारे दृष्टीमध्ये ठळकपणे भरतात. रामकथा, भागवतकथा, नामजपसप्ताह, नामसंकीर्तन इत्यादींमध्ये सामील असणारे उघडपणे दिसतात. तीर्थयात्रा करणारे, मंदिरात जाणारे, सत्संग करणारे वगैरे लोक देखील पटकन नजरेत भरतात. पण आपण जर अंतरंग पाहू लागलो तर असे आढळते आहे की वरपांगी नामस्मरणाला नाकारणारे आणि स्वत:ला नास्तिक म्हणवणारे देखील सलोख्याने एकत्र येण्याच्या आणि उन्नत होण्याच्या ह्या प्रक्रियेत सामावण्यासाठी अंतर्यामी उत्सुक आहेत! बाहेरून नामस्मरणाबद्दल उदासीन भासणारे नामचैतन्यमय होण्याच्या मन:स्थितीत आहेत! एवढेच नव्हे तर; अहंकारात, वैफल्यात, गर्वात, गुन्हेगारीत, व्यसनात, गरीबीत, अज्ञानात, व्याधींमध्ये, वार्धक्यात आणि अपंगत्वात अडकलेले आणि गुरफटलेले असहाय्य जीव देखील अंतर्यामी नामसंजीवनीसाठी व्याकूळ झाले असून त्यांचे प्राण कंठाला आलेले आहेत! थोडक्यात सांगायचे तर; गुन्हेगारीच्या, पापाच्या, किंवा न्यूनतेच्या भावनेने होरपळणाऱ्या आपणा सर्वांना कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून चैतन्यवर्षा दिसू लागण्याची आणि तिची अनुभूती मिळण्याची वेळ आली आहे!
Rate It
चैतन्यवर्षा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीक
Posted by on Friday, 22nd May 2015
चैतन्यवर्षा: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
आपल्या अंतरंगात अजरामर असे वैश्विक चैतन्य आहे आणि आपले जीवन म्हणजे त्या चैतन्याचा अंश आहे असे लहानपणापासून ऐकत आलो. पण ते चैतन्य काय व कसे असते हे माहीत नव्हते.
अशा परिस्थितीत; जेव्हा आपल्यामधील उणीवा आणि दोष सलत होते आणि जगातील समस्या मनाला भेडसावीत होत्या; तेव्हा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या द्वारे; सर्वान्तर्यामीचे हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे समजू लागले. तसेच नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; हे कळू लागले. एवढेच नव्हे; तर नामस्मरणाशिवाय समाधान होऊ शकत नाही आणि जीवनाला सार्थकता आणि पूर्णत्व येऊ शकत नाही याची खात्री झाली.
याचा परिणाम असा झाला की, स्वत:च्या रोगावरील उपाय सापडल्यावर ज्याप्रमाणे एकदा रोगी त्याच्यासारख्या इतर रोग्यांना तो उपाय सांगू लागतो त्याचप्रमाणे नामस्मरणावर मी पुस्तके लिहायला सुरुवात केली. नामस्मरणाचे साधन जगात सर्वदूर पसरावे आणि आपल्याप्रमाणेच इतर सर्वांची अस्वस्थता कमी व्हावी आणि समाधान वाढीस लागावे याचा ध्यास लागला.
परंतु इतरांना सांगणे सोपे असले तरी; ज्याप्रमाणे औषध फुकट मिळत असताना देखील आपल्याकडून काही वेळा उपचार घेतले जात नाहीत, त्याप्रमाणे माझेही मन नामस्मरणात पुरेसे रमत नव्हते.
असे का होत असावे? इतका निरुत्साह का असावा?
या प्रश्नाचा विचार करता करता असे लक्षात आले की, आपल्यामधील दृढमूल झालेला जडपणा, आळस, निराशा, गोंधळ, संशय, अविश्वास, निराशा, हतबलता, असहाय्यता इत्यादीमुळे आपल्याला अंतर्बाह्य व्यापून असणाऱ्या नामचैतन्याची वर्षा जगामध्ये सर्वत्र होत असताना देखील आपल्याला जाणवली नाही!
जेव्हा अंतर्बाह्य व्यापणारी आणि अंतर्बाह्य फुलवणारी गुरुकृपा वा नामचैतन्यवर्षा, वैश्विक आणि वैयक्तिक पातळीवरील गुरुकृपेनेच जाणवली तेव्हा नामस्मरणाच्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याने मी पुन्हा एकदा भारावून गेलो! मन एकदम शांत आणि प्रफुल्लीत झाल! ऊर कृतज्ञतेने भरून गेला!
सर्वानी चिंब भिजून नामचैतन्यमय होण्यासाठी आणि पूर्णत्वाला जाण्यासाठी असलेल्या ह्या सुवर्णसंधीची शुभवार्ता सर्वाना केव्हा एकदा सांगतो अस झाल आणि उतावीळपणे मी लिहायला सुरुवात केली!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै: श्री गुरवे नम:
Rate It
वैश्विक वसंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीक
Posted by on Tuesday, 19th May 2015
वैश्विक वसंत: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर
वैश्विक वसंत बहरत आहे. पण त्याची चाहूल सहज लागत नाही. त्यामुळे निराशा येते. जीवन व्यर्थ वाटते. उलटपक्षी इतर लोकांचे यश पाहून देखील; स्वत:विषयी न्यूनता येऊन खिन्नता वाटते.
पण इतरांमध्ये किंवा आपल्यामध्ये कितीही दोष दिसले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपल्या सर्वांच्या अंतरंगात लोककल्याणकारी उर्जा आहे. आपल्या अंतरंगाशी आणि इतरांच्या अंतरंगाशी जोडले जाणे म्हणजेच योग. नामस्मरण हा बहुतेक सर्वांना पटेल, जमेल, रुचेल असा योगमार्ग आहे. म्हणूनच नामस्मरणाद्वारे आपल्या आणि सर्वांच्या अंतरंगातील चैतन्यदायी उर्जा आपल्याला मिळते आणि खिन्नता नाहीशी होते.
वैयक्तिक गरजांचे आणि संकुचित स्वार्थाचे बंधन आणि ओझे अंगवळणी पडून आवडू लागल्यामुळे आणि आळसामुळे सुरुवातीला; नामस्मरणाचा वीट देखील येउ शकतो. पण तरीही नामस्मरण करीत राहिले तर हळू हळू आपल्या आणि इतरांच्या अंतरंगातील सच्चिदानंदाची आणि विहंगम वसंताची संजीवक प्रचीती येते. ह्या निरागस प्रेममय प्रचीतीतून लोक कल्याणाची महान कार्ये स्फुरतात आणि साकारतात. हाच खरा योग, हाच खरा स्वधर्म आणि हीच खरी भक्ती.
Rate It
SURRENDER AND NAMASMARAN: DR. SHRINIWAS KASHALIKAR
Posted by on Saturday, 2nd May 2015
SURRENDER AND NAMASMARAN: DR. SHRINIWAS KASHALIKAR
Student: Sir, it is often said that we have to surrender to our Guru or God.
Teacher: It is true that surrender is held in very high esteem!
Student: But how to surrender? Every time I think of surrendering; I feel that I am being submissive to something imaginary. I feel that I am becoming paranoid.
Teacher: This is because; we are completely amalgamated in our body, instincts, feelings and our thoughts; we are unable to “sense” our innate core, our true self, which is beyond our consciousness! Hence we don’t realize that surrender to Guru or God; is actually; surrender to our own innate core; our true self! If and when this becomes clear the feeling of being paranoid would not emerge!
Student: OK! This makes sense theoretically; but; how to actually surrender?
Even if I say or feel that I have surrendered, how can I vouch for actually having surrendered from the depths of my unconscious and subconscious mind? Moreover; honestly speaking; I cannot deny the fact that most of the time I behave according to my urges, impulses, passions, feelings and ideas! How can I then assume that I have surrendered?
Teacher: This is a very honest admission. Most of us routinely endorse the value of surrender. But we actually don’t understand much about it. When we say that we surrender; it actually means that we wish to or would like to endorse the sovereignty of our true self; our Guru!
Student: Can you please explain further?
Teacher: Yes. Surrender is a subconscious process of victory over the “self” which is generally at war with the true self! This process begins with the acceptance and practice of NAMASMARAN; as advocated by our Guru!
Later; the protracted practice of NAMASMARAN is associated with conquest over the stifling urges, desires, aims, opinions, prejudices, whims, fancies, convictions, plans and dreams, which we cherish as “ours” and which are at war with the divine plan of our true self! This is associated increasing acceptance and decreasing resistance to everything we go through at every moment!
Student: Is this not the same as coming to terms with life? Is this not defeatism?
Teacher: Defeatism is acceptance of a condition; out of our inability and weakness; and out of frustration. Surrender, which we are referring to; is actually associated with realization of what is truly ours and hence discarding of what is not truly ours. This happens! This is not done in a planned manner and is associated with the process of NAMASMARAN and is certainly the grace of our hitherto inaccessible true self, our Guru!
Student: In simple words; I should intensify the practice of NAMASMARAN; let the promotion be its byproduct; and accept everything as his grace; right?
Teacher: Yes. Guru is always there; showering His bounties!
Rate It
BEYOND SENILITY: DR. SHRINIWAS KASHALIKAR
Posted by on Wednesday, 8th April 2015
BEYOND SENILITY: DR. SHRINIWAS KASHALIKAR
In modern days aging is a major concern. There is a definite fear about aging and senility. There is a feeling of helplessness.
This is because; we take into account our physical characteristics such as our looks, our strength, our sexual potency, sexual charm etc. while considering the aging and senility. All these deteriorate and hence we get frustrated. Moreover; our intellectual capacity diminishes and our mind becomes weak and fickle! So, we feel miserable as aging advances.
But a person who practices NAMASMARAN, counts his or her life in terms of the count of NAMA! Since the count of NAMA goes on increasing with age, he or she feels increasingly satisfied even in the presence of debilitating symptoms of aging! This is like getting something far more valuable and far more endearing in exchange of something of relatively lesser value and of lesser concern!
In fact, this is like entering in a new and beautiful house, while the old is getting dilapidated and nearing collapse.
It can also be compared to returning to mother NAMA; after prolonged separation and being in the veil of the step mother viz. the body senses and the illusions created by them, which is undergoing aging and senility! Naturally the practitioner of NAMASMARAN, who is now in the perceptibly caring custody of Guru Mauli (NAMA); is increasingly fulfilled even amidst the aging and senility!
Rate It